Video | राज कुंद्रा भावूक, थेट रडत रडत म्हणाला, माझ्या पत्नीला आणि मुलांना यामध्ये…
राज कुंद्रा हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. राज कुंद्रा याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. राज कुंद्रा हा गेल्या काही वर्षांपासून चेहऱ्याला मास्क लावून फिरताना दिसतोय. राज कुंद्रा याने काही दिवसांपूर्वीच मोठी घोषणा केली.

मुंबई : राज कुंद्रा हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. राज कुंद्रा (Raj Kundra) याच्यावर काही दिवसांपूर्वीच अत्यंत गंभीर आरोप झाले. इतकेच नाही तर थेट काही महिने जेलमध्ये राहण्याची वेळ ही राज कुंद्रा याच्यावर आली. राज कुंद्रा याला थेट पाॅर्न किंग म्हटले गेले. राज कुंद्रा याच्यासह शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिच्यावर टिका करण्यात आली. राज कुंद्रा याच्यावर होत असलेले आरोप पाहून शिल्पा शेट्टी हिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. राज कुंद्रा याला शिल्पा शेट्टी घटस्फोट देणार असल्याची देखील चर्चा रंगली.
राज कुंद्रा हा जेलमधून बाहेर आल्यापासून सतत चेहऱ्याला मास्क लावून फिरताना दिसला. राज कुंद्रा याने आपला चेहरा कोणालाच दाखवला नाही. इतकेच नाही तर शिल्पा शेट्टी ही देखील सोबत असताना त्याने आपल्या चेहऱ्याचे मास्क कधीच काढले नाही. यावरून राज कुंद्रा याची लोक खिल्ली उडवताना देखील दिसते.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वीच राज कुंद्रा याच्याकडून मोठी घोषणा करण्यात आलीये. राज कुंद्रा हा चित्रपटात धमाका करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे राज कुंद्रा याच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून तोच चित्रपटात अभिनेत्याच्या भूमिकेत आहे. नुकताच आता राज कुंद्रा याच्या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज करण्यात आलंय.
विशेष म्हणजे यूटी 69 चित्रपटाचा ट्रेलरचा कार्यक्रम अत्यंत मोठा ठेवण्यात आला. यूटी 69 हे राज कुंद्रा याच्या चित्रपटाचे नाव आहे. यूटी 69 चित्रपटाच्या ट्रेलर लाॅन्च वेळी राज कुंद्रा हा खूप जास्त भावूक होताना दिसला. इतकेच नाही तर भावूक होत भर कार्यक्रमात ढसाढसा रडताना राज कुंद्रा हा दिसला. यावेळी त्याने मोठे भाष्य देखील केले.
View this post on Instagram
राज कुंद्रा म्हणाला की, तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते फक्त मला बोला…माझ्या बायकोला आणि मुलांना नका बोलू…त्यांनी तुमचे काही बिघडवले नाहीये…हे बोलताना राज कुंद्रा हा खूप जास्त भावूक होताना दिसला. राज कुंद्रा याच्या यूटी 69 चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये राज कुंद्रा याचा जेलमधील प्रवास दाखवण्यात आलाय. यामध्ये तो रडताना देखील दिसतोय.