“शिल्पा शेट्टी खरंच तुझ्यासोबत की हे फक्त नाटक?”; चाहत्याच्या प्रश्नावर राज कुंद्राचं भन्नाट उत्तर

दिखावा की खरं प्रेम? शिल्पा शेट्टीबद्दल प्रश्न विचारताच राज म्हणाला..

शिल्पा शेट्टी खरंच तुझ्यासोबत की हे फक्त नाटक?; चाहत्याच्या प्रश्नावर राज कुंद्राचं भन्नाट उत्तर
Shilpa and RajImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 3:48 PM

मुंबई- पॉर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगातून सुटल्यानंतर बऱ्याच महिन्यांनी व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा ट्विटरवर पुन्हा सक्रिय झाला. नुकतंच राजने ट्विटरवर नेटकऱ्यांनी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं दिली. पॉर्नोग्राफी प्रकरणात राजला अटक झाल्यानंतर शिल्पा त्याला घटस्फोट देणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात ही जोडी अद्याप एकत्र आहे. यावरूनच एका ट्विटर युजरने राजला प्रश्न विचारला. “तू आणि शिल्पा शेट्टी खरंच एकमेकांसोबत आहात की हे सर्व नाटक आहे”, असा प्रश्न संबंधित नेटकऱ्याने विचारला. त्यावर राजनेही त्याच्या अंदाजात उत्तर दिलं.

राज कुंद्राचं उत्तर-

“हाहाहाहा.. मला हा प्रश्न आवडला. प्रेम हे नाटक नसतं आणि ते दिखाव्यासाठी करता येत नाही. येत्या 22 नोव्हेंबर रोजी आमच्या लग्नाचा 13 वा वाढदिवस आहे. त्यादिवशी आम्हाला शुभेच्छा द्यायला विसरू नकोस”, असं उत्तर राजने दिलं.

हे सुद्धा वाचा

राज आणि शिल्पाने 2009 मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांना समिशा ही मुलगी आणि वियान हा मुलगा आहे. जवळपास वर्षभरानंतर राज ट्विटर अकाऊंटवर पुन्हा सक्रिय झाला आहे.

जुलै 2021 मध्ये पॉर्नोग्राफी प्रकरणात राजला अटक झाली होती. मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात जवळपास दोन महिने राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. जामिनाला वर्ष पूर्ण झाल्यानंतर राजने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) पत्र लिहून या प्रकरणात न्यायाची मागणी केली. मी निर्दोष असून मला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा दावा त्याने केला आहे.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....