Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा तुरुंगात का गेले? 11 वर्षांच्या मुलाला शिल्पा शेट्टीने काय दिलं होतं उत्तर? राज कुंद्राचा खुलासा

राज कुंद्राला अश्लील चित्रफित निर्मिती प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याने दोन महिने तुरुंगवास भोगला. जामिनावर सुटल्यानंतर राजने त्याच्या तुरुंगातील दिवसांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. यानिमित्त दिलेल्या मुलाखतीत तो मुलांविषयी व्यक्त झाला.

बाबा तुरुंगात का गेले? 11 वर्षांच्या मुलाला शिल्पा शेट्टीने काय दिलं होतं उत्तर? राज कुंद्राचा खुलासा
Shilpa Shetty and Raj KundraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 27, 2023 | 3:58 PM

मुंबई : 27 ऑक्टोबर 2023 | अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. जवळपास दोन महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. जामिनावर सुटल्यानंतर राज नेहमीच चित्रविचित्र मास्कने चेहरा झाकताना दिसला. आता तुरुंगातील दिवसांबद्दल त्याचा UT69 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत राज त्याच्या कुटुंबीयांवर झालेल्या परिणामाविषयी व्यक्त झाला. “तुरुंगात गेल्याने माझी आणि माझ्या कुटुंबीयांची प्रतिमा मलिन झाली होती. त्यांना खूप त्रास सहन करावा लागला,” असं राजने सांगितलं. या मुलाखतीत राजने हेसुद्धा सांगितलं की तुरुंगात गेल्यानंतर त्याच्या 11 वर्षांच्या मुलाने शिल्पाला बरेच प्रश्न विचारले होते.

“माझी मुलगी खूप लहान असल्याने तिचा ऑनलाइन गोष्टींशी संबंध येतच नाही. पण माझा मुलगा आता 11 वर्षांचा झाला आहे. मी त्याचा हिरो आहे. त्याचा माझ्यावर खूप विश्वास आहे. तू चिंता करून नकोस, असं आम्ही त्याला समजावत होतो. तो सोशल मीडियावर नाही, त्यामुळे तो कमेंट्स वाचू शकत नाही. पण त्याच्या मित्रांमध्ये चर्चा होत असते. मला हेसुद्धा माहीत आहे की या वयात त्यांच्यात एकी असते”, असं राजने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

याविषयी राज पुढे म्हणाला, “माझ्या मुलाने शिल्पाला विचारलं होतं की नेमकं काय आणि का झालं? त्यावर शिल्पाने त्याला तेच उत्तर दिलं जे एका 11 वर्षांच्या मुलाला दिलं पाहिजे. सोशल मीडियावरील ट्रोल्सचा माझ्यावरही खूप परिणाम व्हायचा. मला त्या प्रत्येकाला उत्तर द्यायची खूप इच्छा होती. पण शिल्पाने मला रोखलं. सुरुवातीला मला खूप वाईट वाटायचं, तेव्हा मला त्यांना उत्तर देण्याची खूप इच्छा व्हायची. पण शिल्पाने मला समजावलं की मी काहीच चुकीचं केलं नाही. ट्रोलर्सना उत्तर देऊन तू फक्त त्यांना अधिक लक्ष देशील. तू न्यायावर विश्वास ठेव.”

राज कुंद्राचा UT69 हा चित्रपट येत्या 3 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये राज कुंद्रा पहिल्यांदाच अभिनय करताना दिसणार आहे. या चित्रपटात त्याने तुरुंगातील दिवसांबद्दल उपरोधिकरित्या भाष्य केलं आहे.

कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला.
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा.
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला.
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी.
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.