Raj Kundra | राज कुंद्रा रोमँटिक मूडमध्ये, शिल्पा शेट्टी हिच्याबद्दल म्हटले, मला माहिती आहे की…
राज कुंद्रा हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. राज कुंद्रा हा लवकरच बाॅलिवूड चित्रपटांमध्ये धमाका करताना दिसणार आहे. राज कुंद्रा याच्यावर काही दिवसांपूर्वीच अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले.

मुंबई : शिल्पा शेट्टी ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी खास व्हिडीओ (Video) आणि फोटो शेअर करताना दिसते. 2021 मध्ये शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याच्यावर अत्यंत गंभीर आरोप हे करण्यात आले. राज कुंद्रा याच्यावर झालेल्या आरोपांनंतर अनेकांनी थेट शिल्पा शेट्टी हिला देखील टार्गेट करण्यास सुरूवात केली.
शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याचे नाव थेट पोर्नोग्राफी प्रकरणात आले. फक्त नावच नाही तर थेट या प्रकरणात काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळ ही राज कुंद्रा याच्यावर आली. यानंतर शिल्पा शेट्टी हिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. राज कुंद्रा याला यादरम्यान थेट पाॅर्न किंग देखील म्हटले गेले. हे सर्वांसाठीच खूप जास्त धक्कादायक होते.
पोर्नोग्राफी प्रकरणात नाव आल्यापासून राज कुंद्रा हा सतत चेहऱ्याला मास्क लावून फिरताना दिसला. राज कुंद्रा हा आता लवकरच बाॅलिवूडमध्ये धमाका करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे राज कुंद्रा याचा यूटी 69 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटातून राज कुंद्रा हा अत्यंत मोठे खुलासे करणार असल्याचे सांगितले जातंय.
I know I am in love with you because my reality is finally better than my dreams 🙏❤️🧿🤗 @theshilpashetty #Love #Gratitude #Queen pic.twitter.com/SfGa0EyU8K
— Raj Kundra (@onlyrajkundra) October 21, 2023
यूटी 69 चित्रपटामध्ये राज कुंद्राच हा मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून राज कुंद्रा हा त्याच्या जेलमधील 69 दिवसांचा खुलासा करताना दिसणार आहे. यापूर्वीही मुलाखतीमध्ये राज कुंद्रा हा जेलमधील जेवणाबद्दल आणि तेथील राहण्याच्या सोयीबद्दल अनेकदा बोलताना दिसला आहे. इतकेच नाही तर जेलची जागा सर्वात वाईट असल्याचे त्याने सांगितले.
नुकताच आता राज कुंद्रा याने एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. राज कुंद्रा याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याचे आणि शिल्पा शेट्टीचे काही खास फोटो दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत राज कुंद्रा याने लिहिले की, मला माहित आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो, कारण माझे वास्तव माझ्या स्वप्नांपेक्षा खूप जास्त चांगले आहे. यासोबत राजने काही हॅशटॅग देखील दिले आहेत.