सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका ; भावाला सतावतेय बहिणीची चिंता, पोस्ट करत म्हणाला…

सुष्मिता सेन आणि राजीव सेन कोणत्याही परिस्थितीत एकमेकांची साथ सोडत नाही, अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर भाऊ म्हणाला...

सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका ; भावाला सतावतेय बहिणीची चिंता, पोस्ट करत म्हणाला...
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 5:05 PM

मुंबई : अभिनेत्री सुश्मिता सेन कायम तिच्या फिटनेसबाबत जागृत असते. जीम, योगा करत अभिनेत्री स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत असते. पण अभिनेत्रीला ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. इस्टाग्रामवर सुश्मिता सेन हिने याबद्दल माहिती दिली आहे. त्यानंतर तिच्या फॅन्स आणि फॉलोअर्सने लवकर बरी होण्याची प्रार्थना केली आहे. आता सुष्मिताची प्रकृती स्थिर आहे. चाहत्यांसोबतच अभिनेत्रीचा भाऊ राजीव सेन याला देखील बहिणीच्या प्रकृतीबाबत चिंता सतावत आहे. राजीवने सुष्मितासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या राजीवची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र राजीवच्या पोस्टची चर्चा रंगत आहे.

राजीव आणि सुष्मिता कोणत्याही परिस्थितीत एकमेकांची साथ सोडत नाहीत. भाऊ – बहिण कायम एकमेकांसोबत खंबीरपणे उभे असतात. चाहते सुष्मिताच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत असताना, राजीव याने देखील बहिणीचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘ टू माय स्ट्रॉन्गेस्ट… भाई लव यू मोस्ट मोस्ट’ असं लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

गुरुवारी सुष्मिताने वडिलांसोबत एक फोटो पोस्ट करत चाहत्यांना कठीण दिवसांबाबत सांगितलं. शिवाय अभिनेत्रीने या कठीण प्रसंगी ज्यांनी मदत केली, त्यांचे देखील अभार मानले आहेत. पण आता अभिनेत्रीची प्रकृती स्थिर आहे. सुश्मिताने पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्या उत्तम आरोग्यासाठी चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटी देखील प्रार्थना करत आहेत.

सुष्मिताच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री ‘आर्या २’ वेब सीरिजच्या यशानंतर ‘आर्या ३’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारकाना दिसणार आहे. सध्या सर्वत्र सुष्मिताच्या ‘आर्या ३’ सीरिजची चर्चा रंगत आहे. चाहते ‘आर्या ३’च्या प्रतीक्षेत आहेत. सुष्मिता कायम तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असते. त्यामुळे अभिनेत्री ‘आर्या ३’ सीरिजची घोषणा कधी करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

सुष्मिता सेन कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो  आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.