Video : उन्हातान्हात भुका, घसा पडलाय सुका डोळ्यातलं पानी तरी खळना, शालूची ही दमदार अदा पाहाच!
नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या फँड्री चित्रपटातून राजेश्वरी खरातने (Rajeshwari Khara) मराठी चित्रपटसृष्टीत यशस्वी पाऊल टाकले.
मुंबई : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या फँड्री चित्रपटातून राजेश्वरी खरातने (Rajeshwari Khara) मराठी चित्रपटसृष्टीत यशस्वी पाऊल टाकले. पहिल्याच चित्रपटातून राजेश्वरीला प्रचंड लोकप्रियता मिळाली पण तिचा हा चित्रपट आल्यानंतर ती गायब झाली होती. अनेक वर्ष राजेश्वरी अभिनय क्षेत्रापासून दूर गेली होती. पण अचानक परत एकदा राजेश्वरी चर्चेत आली ती म्हणजे सोशल मीडियावरील तिच्या फोटो आणि व्हिडीओमुळे मात्र, आता जब्याची शालू पूर्णपणे बदलली आहे. (Rajeshwari Kharat’s video goes viral on social media)
View this post on Instagram
शालू म्हटंले की, आपल्याला आठवण होते फँड्री चित्रपटातून त्या सोज्वळ चेहऱ्याची परंतू शालू आता स्टायलिश आणि ग्लॅमरससोबत घेऊन आला आहे. सुरूवातीला तिला ओळखणे देखील अवघड आहे. कारण आता शालू प्रचंड बदलली आहे. खरं तर चित्रपटात तिच्या तोंडी एकही डायलॉग नव्हता. मात्र, तिने नजरेनेच चाहत्यांची मने जिंकली होती.
View this post on Instagram
आता राजेश्वरी पुन्हा एकदा अभिनयाकडे परतली आहे. लवकरच तिचा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकताच राजेश्वरी खरातने सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये राजेश्वरी एका हिंदी गाण्यावर चालताना डान्स करताना दिसत आहे. यामध्ये तिचा एकदम ग्लॅमरस अंदाज दिसत आहे.
संबंधित बातम्या :
Video : राखं झाली जगन्याची हाय तरी जीता भोळं प्रेयम माझं… शालूच्या झक्कास अदा, चाहते बघताच फिदा!
फँड्रीफेम शालूचे इंग्लिश गाण्यावर लटके झटके; घायाळ चाहते म्हणतात, जीव झाला येडा पिसा रात रात जागन…
(Rajeshwari Kharat’s video goes viral on social media)