नरेंद्र मोदी यांना सपोर्ट करताना दिसले रजनीकांत आणि अक्षय कुमार, खास पोस्ट शेअर करत लिहिले…
बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा कायमच चर्चेत असतो. अक्षय कुमार याचे एका वर्षाला तब्बल चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अक्षय कुमार याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा कायमच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. अक्षय कुमार याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट (Movie) काही खास धमाका करू शकत नाहीयेत. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या देखील चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही. अक्षय कुमार याचा हा चित्रपट फ्लाॅप गेला. अक्षय कुमार याचे एका मागून एक चित्रपट फ्लाॅप जात आहेत.
अक्षय कुमार हा हेरा फेरी 3 मध्ये दिसणार नसल्याचे सांगितले गेले. इतकेच नाही तर एका कार्यक्रमात हेरा फेरी 3 चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली नसल्याने आपण चित्रपटाला नकार दिल्याचे अक्षय कुमार याने सांगितले. मात्र, त्यानंतर अचानकपणेच अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 चित्रपटाला होकार दिला. ज्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला.
View this post on Instagram
अक्षय कुमार याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये चक्क बीचवर अक्षय कुमार हा झाडू मारताना दिसतोय. अक्षय कुमार याने हा फोटो शेअर करत स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतलाय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर रोजी स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करण्याचे आवाहन केले. याच आवाहनाला प्रतिसाद देत अक्षय कुमार याने श्रमदान केले.
हा श्रमदानाचा फोटो शेअर करत अक्षय कुमार याने खास कॅप्शन देखील दिले. अक्षय कुमार याने लिहिले की, देशातून बाहेर असतानाही स्वच्छता मोहिमेला श्रद्धांजली देण्यापासून मी थांबू शकलो नाही. म्हणूनच मी सांगेल की, तुम्ही कुठेही असाल तिथे तुमचे स्थान आणि डोके अव्यवस्थापासून दूर ठेवा. योगदान द्या.
A healthy environment begins with a clean environment..Let’s keep India clean… #SwachhBharat @SwachhBharatGov
— Rajinikanth (@rajinikanth) October 1, 2023
साऊथ स्टार रजनीकांत हे देखील स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेत. रजनीकांत यांनी लिहिले की, स्वच्छ वातावरणापासून निरोगी वातावरणाची सुरुवात होते… चला भारत स्वच्छ ठेवूया…रजनीकांत यांनी शेअर केलेली ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसली. आता चाहते यावर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.