रजनीकांत यांच्या मुलीचा संसार मोडला, 2 वर्षानंतर कोर्टाकडून मोठा निर्णय
Rajinikanth Daughter Divorce: रजनीकांत यांच्या मुलीने 2 वर्षांपूर्वी केली घटस्फोटाची घोषणा... तीनवेळा सुनावणी झाल्यानंतर अखेर कोर्टाने देखील घेतला मोठा निर्णय... सध्या सर्वत्र रजनीकांत यांच्या मुलीच्या खासगी आयुष्याची चर्चा...
Rajinikanth Daughter Divorce: दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता धनुष आणि सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या यांचा अधिकृत घटस्फोट झाला आहे. 27 नोव्हेंबर 2024 रोजी चेन्नई कोर्टाने दोघांच्या घटस्फोचाला मंजुरी दिली आहे. तब्बल 18 वर्ष एकत्र संसार केल्यानंतर धनुष आणि ऐश्वर्या यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तामिळनाडूतील कौटुंबिक न्यायालयाने बुधवारी धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली.
चित्रपट दिग्दर्शक कस्तुरीराजा यांचा मुलगा धनुष आणि सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या यांचा विवाह 18 नोव्हेंबर 2004 रोजी दोन्ही कुटुंबांच्या आशीर्वादाने झाला. त्यांना यात्रा आणि लिंग असे दोन मुले आहेत. ऐश्वर्या – धनुष यांनी दोन वर्षांपूर्वी घटस्फोटाची घोषणा केली आहे. अखेर कोर्टाने देखील त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे.
View this post on Instagram
धनुष आणि ऐश्वर्या यांनी 18 वर्ष संसार केल्यानंतर 2022 मध्ये विभक्त होणार असल्याची घोषणा केली. 2022 मध्ये दोघांनी देखील घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. सांगायचं झालं तर, दोघांच्या घटस्फोटावर तीन वेळा सुनावणी झाली. पण तिन्ही वेळा सुनावणीसाठी दोघे हजर राहिले नाहीत. पण 21 नोव्हेंबरला दोघेही चेन्नई कोर्टात इन-कॅमेरा कारवाईत सहभागी झाले होते.
बंद कॅमेऱ्यात झाली सुनावणी…
21 नोव्हेंबर रोजी धनुष आणि ऐश्वर्या न्यायमूर्ती सुभादेवी यांच्यासमोर हजर झाले, ज्यांनी इन-कॅमेरा सुनावणी घेतली. यादरम्यान दोघेही विभक्त होण्यावर ठाम राहिले आणि अखेर बुधवारी न्यायाधीशांनी दोघांच्या घटस्फोटाला मंजुरी दिल्याचं सांगण्यात येत आहे.
View this post on Instagram
धनुष आणि ऐश्वर्या यांच्याकडून घटस्फोटाची घोषणा…
सांगायचं झालं तर, 17 जानेवारी 2022 रोजी धनुष आणि ऐश्वर्याने एक निवेदन जारी करून वेगळे होण्याची घोषणा केली होती. ’18 वर्षांची दोस्ती… पती पत्नी आणि आई – वडिलांच्या रुपात एकत्र व्यतीत केलेल्या वेळेनंतर आम्ही दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे… आमच्या दोघांचे मार्ग आता वेगळे होत आहेत.’ असं दोघांनी निवेदनात लिहिलं होतं.