ऐश्वर्यासोबत रजनीकांत यांचे लव्ह सीन, बिग बी म्हणाले, ‘खबरदार रजनी जर…’
ऐश्वर्या राय हिच्यासोबत लव्ह सीन देताना का घाबरले होते रजनीकांत? त्यांना कोणाची वाटत होती भीती? 'रोबोत' सिनेमात ऐश्वर्या आणि रजनीकांच्या यांच्यावर चित्रित करण्यात आले होते लव्ह सीन्स... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या - रजनीकांत यांच्या लव्ह सीन्सची चर्चा...
मुंबई | 3 मार्च 2024 : अभिनेते रजनीकांत यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही रजनीकांत यांचे सिनेमे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आणि आनंदी असतात. सांगायचं झालं तर, रजनीकांत यांनी आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत स्क्रिन शेअर केली आहे. पण अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत रजनीकांत यांच्या नावाची तुफान चर्चा रंगली आहे. रजनीकांत आणि ऐश्वर्या यांनी ‘रोबोट’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली. सिनेमा चाहत्यांना प्रचंड आवडला.
सिनेमात रजनीकांत आणि ऐश्वर्या यांना कपल दाखवण्यात आलं. सिनेमात दोघांचे लव्हसीन देखील होते. सिनेमाची तुफान चर्चा देखील झाली. लहान मुलांपासून वृद्धांना देखील सिनेमा प्रचंड आवडला. सिनेमात ऐश्वर्या हिच्यासोबत लव्ह सीन देताना रजनीकांत यांच्या मनात भीती होती. ते पूर्णपणे घाबरलेले होता. त्यांची अवस्था देखील खराब झाली होती. त्यामुळे ऐश्वर्या हिच्यासोबत लव्ह सीन देतात रजनीकांत यांना अनेक रीटेक देखील द्यावे लागले.
रजनीकांत यांनी एक मुलाखतीत एक मोठं कारण सांगितलं होतं. रजनीकांत म्हणाले, ‘अमिताभ बच्चन यांच्यासोबत माझी चांगली मैत्री आहे. त्यामुळे मला भीती वाटत होती. ऐशर्या हिच्यासोबत लव्ह सीन देताना माझ्या मनात दडपण होतं. ऐश्वर्या जन्मतः उत्तम अभिनेत्री आहे. पण मी घबरलो होतो.’
पुढे रजनीकांत म्हणाले, ‘मला भीती वाटत होती. माझ्या मनात अमिताभ यांची भीती होती. ते मला म्हणाले असते ‘खबरदार रजनी…’ सांगायचं झालं तर, ऐश्वर्या कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील ऐश्वर्या हिच्या सिनेमांचे फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात.
ऐश्वर्या राय देखील रजनीकांत यांचा आदर करते, जेव्हा अभिनेत्री रजनीकांत यांना भेटते तेव्हा त्यांना चरणस्पर्श नमस्कार करते. अनेक ठिकाणी रजनीकांत आणि ऐश्वर्या यांना स्पॉट देखील केलं जातं… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या हिची चर्चा रंगली.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ऐश्वर्या हिला अभिनेता आमिर खान याच्यासोबत ‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमाची देखील ऑफर होती. पण ऐश्वर्याने सिनेमा करण्यास नकार दिला. त्यानंतर ‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमात अभिनेत्री करिश्मा कपूर हिला कास्ट करण्यात आलं. ऐश्वर्या आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.