राजकुमार राव आणि पत्रलेखा अडकले विवाहबंधनात, अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले फोटो

पत्रलेखा आणि राजकुमार त्यांच्या एंगेजमेंटमध्ये व्हाइट आउटफिटमध्ये दिसले होते. पांढऱ्या आउटफिटमध्ये दोघेही खूप रॉयल दिसत होते. त्यांच्या लग्नाला कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. राजकुमार रावने पत्रलेखाला गुडघ्यावर बसून प्रपोज केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून पत्रलेखानेही गुडघ्यावर बसून त्याचा प्रस्ताव स्वीकारला होता.

राजकुमार राव आणि पत्रलेखा अडकले विवाहबंधनात, अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले फोटो
राजकुमार राव आणि पत्रलेखा अडकले विवाहबंधनात
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 9:54 PM

मुंबई : बॉलिवूडचे प्रतिभावान अभिनेते राजकुमार राव आणि पत्रलेखा विवाहबंधनात अडकले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू होती. या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दोघांच्या लग्नाच्या फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. राजकुमार रावने त्याच्या इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना अभिनेत्याने लिहिले की, अखेर 11 वर्षांच्या प्रेम, मैत्री आणि मजामस्तीनंतर मी माझ्याकडे असलेल्या सर्व गोष्टींसह लग्न केले. माझी सोबती, माझी सर्वात चांगली मैत्रिण, माझे कुटुंब. नवरा म्हणवण्यापेक्षा आज माझ्यासाठी समाधानकारक काहीही नाही.

या फोटोमध्ये राजकुमार राव पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसत आहे. तर लाल रंगाच्या ड्रेसमध्ये पत्रलेखा खूपच सुंदर दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये राजकुमार राव पत्रलेखाच्या भांगमध्ये सिंदूर भरताना दिसत आहे. राजकुमार आणि पत्रलेखा यांचा विवाह चंदीगडच्या लक्झरी रिसॉर्टमध्ये पार पडला. ‘द अबोरोय सुखविलास स्पा’ असे या आलिशान रिसॉर्टचे नाव आहे. या हॉटेलमध्ये खाजगी पूल, आयुर्वेदिक कार्यक्रम आणि हंगामी गादी आहे.

पत्रलेखाने सोशल मीडियावर फोटोही शेअर केले आहेत

पत्रलेखा आणि राजकुमार त्यांच्या एंगेजमेंटमध्ये व्हाइट आउटफिटमध्ये दिसले होते. पांढऱ्या आउटफिटमध्ये दोघेही खूप रॉयल दिसत होते. त्यांच्या लग्नाला कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. राजकुमार रावने पत्रलेखाला गुडघ्यावर बसून प्रपोज केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून पत्रलेखानेही गुडघ्यावर बसून त्याचा प्रस्ताव स्वीकारला होता. दोघांनी रोमँटिक डान्सही केला होता. या सोहळ्याला फराह खान, हुमा कुरेशी, साकिब सलीमसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

राजकुमार आणि पत्रलेखा गेल्या 11 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असतात. राजकुमार कितीही व्यस्त असला तरी पत्रलेखासोबत वेळ घालवण्याची संधी तो कधीच सोडत नाही. आजही तो पत्रलेखाला पत्रे लिहितो. दोघांनी ‘सिटीलाइट’मध्ये एकत्र काम केले होते. (Rajkumar Rao and Patralekha got married, photo share in social media)

इतर बातम्या

दिग्दर्शक रोहित शेट्टी सात महिन्यात बनवणार ‘सिंघम 3’ चित्रपट, असे असेल शूटिंगचे शेड्युल

Gangubai Kathiawadi : ‘या’ तारखेला रिलिज होणार आलिया भट्टचा नवा चित्रपट

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.