‘स्त्री 2’ नंतर पसरलेल्या ‘त्या’ अफवांवरून राजकुमार राव वैतागला; म्हणाला “मी मूर्ख वाटलो का?…”,

'स्त्री २' च्या प्रचंड यशानंतर राजकुमार रावबद्दल  काही अफवा पसरल्या आहेत. या अफवांना वैतागून अखेर  त्याने स्पष्टीकरण दिलं आहे.  काय आहे नेमकी ही अफवा पाहुयात.

'स्त्री 2' नंतर पसरलेल्या 'त्या' अफवांवरून राजकुमार राव वैतागला; म्हणाला मी मूर्ख वाटलो का?...,
Follow us
| Updated on: Nov 25, 2024 | 1:46 PM

बॉक्सऑफिसवर जेव्हा एखादा चित्रपट धमाकेदार चालतो तेव्हा त्याची चर्चा तर होतेच पण सोबतच अनेक अफवांना तोंड फुटतं. त्या चित्रपटाबद्दल असो किंवा त्या चित्रपटातील कलाकारांबद्दल असो. अशाच काही अफवांना एक अभिनेता वैतागला आहे.

‘स्त्री 2’ ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला. या चित्रपटाने भारतात 600 कोटींची कमाई केली तर जगभरात 900 कोटींहून अधिक कमाई केली.मात्र या चित्रपटाच्या यशानंतर चित्रपटातील सर्वच कलाकारांचे कौतुक झाले. पण सोबत चित्रपटातील अभिनेता राजकुमार रावबाबत मात्र बऱ्याच अफवा पसरू लागल्या. या अफवांना आता राजकुमार राव पुरता वैतागला आहे. ती अफवा आहे की ‘स्त्री 2’ च्या यशानंतर ‘या’ राजकुमारने त्याच्या मानधनात वाढ केली आहे.

अखेर मौन सोडलं

चित्रपटाच्या यशानंतर राजकुमार रावने या अफवांना वैतागून अखेर मौन सोडलं आहे तसेच नेमकं काय खरं आहे तेही सांगितलं आहे. चित्रपटानंतर कलाकारांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालं आहे. . श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्येही वाढ झाली. दरम्यान, या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता राजकुमार राव याने त्याची फी वाढवली असल्याचे बोलले जात आहे. मात्र याला राजकुमारने साफ नकार दिला आहे.

मानधनात वाढ खरंच केली आहे का? फी वाढवण्याच्या चर्चांवर राजकुमार राव म्हणाला की, “मी दररोज वेगवेगळे आकडे वाचतो. माझ्या निर्मात्यांवर बोजा वाढवण्याइतका मी मूर्ख नाही. सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा भाग झाल्यानंतर मी अभिनेता म्हणून बदललो नाही. माझ्या आवडीचं काम करण्याचं पैसा हा बाय प्रोडक्ट आहे. मला माझं संपूर्ण आयुष्य काम करायचं आहे, म्हणून मी अशा भूमिका शोधत आहे, ज्या आश्चर्यचकित करतील, उत्साहित करतील, मला आव्हान देतील आणि माझा विकास होण्यास मदत करतील”. असं म्हणत त्याने या अफवांवर पूर्णविराम लावला आहे.

राजकुमार रावचा ‘मालिक’ हा नवीन चित्रपट प्रेक्षांच्या भटीला 

दरम्यान राजकुमार राव नवीन चित्रपट प्रेक्षांच्या भटीला येणार आहे. ‘मालिक’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करायाला राजकुमार राव येणार आहे. काही आठवड्यांपूर्वी मालिक चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं, ज्यामध्ये तो दमदार स्टाईलमध्ये दिसत होता. तसेच मालिक चित्रपट हा एक ॲक्शन थ्रिलर असणार आहे.

मालिक चित्रपटाच्या पोस्टरमध्ये राजकुमार राव जीपच्या वर एके-47 घेऊन उभा असल्याचं दिसत होता. त्याचा लूक आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भाव याने लक्ष वेधून घेतलं. सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. राजकुमार राव पहिल्यांदाच गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.