स्टारकिडमुळे चित्रपटातून रातोरात काढून टाकलं; करण जोहरसमोरच राजकुमारचा खुलासा

अभिनेता राजकुमार राव लवकरच 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत त्याने स्टारकिडने चित्रपट हिसकावल्याचा खुलासा केला. करण जोहरसमोरच त्याने या गोष्टीचा खुलासा केला.

स्टारकिडमुळे चित्रपटातून  रातोरात काढून टाकलं; करण जोहरसमोरच राजकुमारचा खुलासा
Rajkummar RaoImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 19, 2024 | 12:21 PM

अभिनेता राजकुमार राव सध्या त्याच्या आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. करण जोहर निर्मित या चित्रपटात तो अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत मुख्य भूमिका साकारतोय. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत राजकुमारने त्याच्या फिल्मी करिअरविषयी सांगितलं. एका स्टारकिडमुळे रातोरात चित्रपट गमावल्याचा खुलासाही त्याने यावेळी केला. निर्माता करण जोहरसोबतच राजकुमारने ही मुलाखत दिली. यावेळी इनसाइडर-आऊटसाइडरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

या चर्चेदरम्यान करण म्हणाला, “कधी कधी ते फक्त हेडलाइनसाठी हा मुद्दा उपस्थित करतात. ज्यांना यश मिळालंय, तेसुद्धा म्हणतात की मला इंडस्ट्रीबाहेरून आल्याची वागणूक मिळाली किंवा स्टारकिडमुळे माझी संधी हुकली. तर काहीजण म्हणतात की पार्टीला न गेल्याने त्यांना ठराविक भूमिका मिळाली नाही. अशा कोणत्या पार्ट्यांमध्ये भूमिकांची घेवाणदेवाण होते?” यावर उत्तर देताना राजकुमार त्याला म्हणतो, “मी जेव्हा मुंबईत आलो, तेव्हा मलासुद्धा हेच सांगण्यात आलं की मला पार्ट्यांमध्ये उपस्थित राहावं लागेल. जनसंपर्क निर्माण करणं ही समस्या नाही पण त्यासाठी पार्ट्यांमध्ये जाऊन, हाय-हॅलो करणं मला पटत नाही. पण हे खरंय की मला रातोरात एका चित्रपटातून काढून टाकण्यात आलं होतं. एका स्टारकिडने माझी जागा घेतली होती. हे अजिबात योग्य नव्हतं. तुम्ही ठराविक लोकांना ओळखता म्हणून कॉल्स करून काही गोष्टी आपल्या हातात घेणं चुकीचं आहे. नंतर तो चित्रपट पूर्णच होऊ शकला नाही.”

हे सुद्धा वाचा

याआधी दिलेल्या एका मुलाखतीतही राजकुमारने घराणेशाहीवर टीका केली होती. घराणेशाहीमुळेच रातोरात एक चित्रपट हातातून गमावल्याचं त्याने सांगितलं होतं. राजकुमारने आजवर अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. ‘लव्ह सेक्स और धोका’, ‘रागिनी एमएमएस’, ‘गँग ऑफ वासेपूर- पार्ट 2’, ‘काय पो छे’, ‘शाहीद’, ‘क्वीन’, ‘स्त्री’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तो झळकला. लवकरच तो ‘स्त्री 2’ या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो श्रद्धा कपूर, अपारशक्ती खुराना आणि पंकज त्रिपाठी यांच्यासोबत काम करणार आहे. तर जान्हवीसोबतचा त्याचा ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा चित्रपट येत्या 31 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.