Rajpal Yadav | पहिल्या पत्नीविषयी बोलताना राजपाल यादव भावूक; म्हणाला “तिचं पार्थिव माझ्या खांद्यावर..”

1991 मध्ये पहिल्या पत्नीच्या निधनानंतर राजपालने अभिनय क्षेत्रात आपला जम बसवला. 13 वर्षांच्या कालावधीत त्याने इंडस्ट्रीत बरीच मेहनत केली. यावेळी त्याने एनएसडीमध्ये शिक्षण आणि त्याचसोबत चित्रपटांमध्ये काम केलं.

Rajpal Yadav | पहिल्या पत्नीविषयी बोलताना राजपाल यादव भावूक; म्हणाला तिचं पार्थिव माझ्या खांद्यावर..
Rajpal YadavImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 8:55 AM

मुंबई : अभिनेता राजपाल यादवने त्याच्या विनोदी भूमिकांनी आणि विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवलं आहे. आतापर्यंतच्या करिअरमध्ये राजपालने अनेक मजेशीर भूमिका साकारल्या आहेत. मोठ्या पडद्यावर जरी तो कॉमेडी भूमिका साकारत असला तरी खासगी आयुष्यात त्याला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने पहिल्या पत्नीविषयी खुलासा केला. अवघ्या 20 व्या वर्षीच राजपालने त्याच्या पहिल्या पत्नीला गमावलं होतं.

वयाच्या 20 व्या वर्षी झालं लग्न

‘द लल्लनटॉप’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत राजपालने सांगितलं की लहान वयातच त्याचं लग्न झालं होतं. “त्याकाळी जर तुम्ही 20 वर्षांचे असाल आणि तुमच्याकडे चांगली नोकरी असेल तर लग्नासाठी लगेच स्थळं यायची. त्यामुळे वयाच्या 20 व्या वर्षीच वडिलांनी माझं लग्न लावून दिलं. माझ्या पहिल्या पत्नीने मुलीला जन्म दिला आणि डिलिव्हरीनंतर तिचं निधन झालं. दुसऱ्या दिवशी मी तिला रुग्णालयात भेटायला जाणार होतो पण त्याऐवजी मी तिचं पार्थिव माझ्या खांद्यावर उचललं होतं. सुदैवाने माझ्या कुटुंबीयांनी, आईने आणि वहिनींनी माझ्या मुलीची खूप चांगल्याप्रकारे काळजी घेतली. तिला आईची कमतरता त्यांनी भासू दिली नाही”, असं राजपालने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

2003 मध्ये केलं दुसरं लग्न

1991 मध्ये पहिल्या पत्नीच्या निधनानंतर राजपालने अभिनय क्षेत्रात आपला जम बसवला. 13 वर्षांच्या कालावधीत त्याने इंडस्ट्रीत बरीच मेहनत केली. यावेळी त्याने एनएसडीमध्ये शिक्षण आणि त्याचसोबत चित्रपटांमध्ये काम केलं. “मी 31 वर्षांचा होतो, तेव्हा माझी भेट राधाशी झाली. 2001 मध्ये मी ‘द हिरो’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेलो होतो, तिथेच माझी तिच्याशी भेट झाली. आम्हा दोघांच्या कुटुंबीयांच्या परवानगीनंतर अखेर 2003 मध्ये आम्ही लग्न केलं”, असं त्याने पुढे सांगितलं.

दुसऱ्या पत्नीविषयी म्हणाला..

दुसऱ्या पत्नीविषयी बोलताना राजपाल पुढे म्हणाला, “मी माझ्या पत्नीला कधीच साडी नेसण्याची सक्ती केली नाही. मी माझ्या आईशी ज्याप्रकारे बोलतो, तीसुद्धा त्यांच्याशी तशीच बोलते. तिने आमची भाषा शिकून घेतली. एकेदिवशी जेव्हा मी गावी गेलो, तेव्हा मला ती पदराने चेहरा झाकलेली दिसली. कारण गावी महिला तशाच राहतात. होळी आणि दिवाळीनिमित्त ती गावी आवर्जून भेट देते आणि तिला पाच भाषा बोलता येतात याचा अंदाजही कोणी लावू शकत नाही. माझे गुरू आणि आईवडिलांनंतर तिनेच माझी खूप साथ दिली. माझ्या मुलीवर तिने सख्ख्या आईसारखं प्रेम केलं.”

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.