Rajpal Yadav याचे तुरुंगातील 3 महिने, अधीक्षकाला इंप्रेस करण्यासाठी अभिनेता करायचा ‘या’ गोष्टी

Rajpal Yadav | तुरुंगातील तीन महिने राजपाल यादव कधीच नाही विसरु शकत, कैद्यांना आणि अधीक्षकाला इंप्रेस करण्यासाठी अभिनेता करायचा असं काम... सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा... तुरुंगातील दिवसांबद्दल अभिनेत्याचा मोठा खुलासा

Rajpal Yadav याचे तुरुंगातील 3 महिने, अधीक्षकाला इंप्रेस करण्यासाठी अभिनेता करायचा 'या' गोष्टी
Follow us
| Updated on: Oct 23, 2023 | 11:39 AM

मुंबई | 23 ऑक्टोबर 2023 : झगमगत्या विश्वातील अनेक कलाकारांनी तुरुंगातील हवा खाल्ली आहे. काही सेलिब्रिटी वर्षभर तुरुंगात होते तर, काही सेलिब्रिटी दोन-तीन महिने तुरुंगात होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सेलिब्रिटींनी आयुष्य नव्याने सुरु केलं आहे. एवढंच नाही तर, तुरुंगातील अनुभव देखील सेलिब्रिटींनी सांगितले आहेत. अभिनेता राजपाल यादव याने देखील करियरमध्ये चढ – उतारांचा सामना केला आहे. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्याने तुरुंगातील तीन महिन्यांचा अनुभव सांगितला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याची आणि त्याच्या तुरुंगातील दिवसांची चर्चा रंगली आहे.

राजपाल तुरुंगात तीन महिने बंद होता. तुरुंगात असताना अभिनेत्याने अभिनय कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. ज्यासाठी अभिनेत्या परवानगी घेतली होती. तुरुंगात अभिनय कार्यशाळेचं आयोजन करण्यामागे अभिनेत्याचा एक हेतू होता. तुरुंगातील कैद्यांचं अभिनय आणि संगीताचं काहीही संबंध नव्हता.

तुरुंगातील कैद्यांना कलेबद्दल कसलीच माहिती नव्हती. एवढंच नाही तर, कैद्यांनी कला शिकावी आणि कलात्मक व्हावं अशी अभिनेत्याची इच्छा होती. तुरुंगातील अधीकक्ष देखील राजपाल याच्यावर आनंदी होता. अभिनेत्याला स्वतःवर विश्वास होता, एवढंच नाही तर, जेव्हा तुरुंगातून बाहेर निघेल तेव्हा अधिक धीट झालेलो असेल असं देखील अभिनेता म्हणाला.

हे सुद्धा वाचा

महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुरुंगात असताना राजपाल फक्त स्वतःचं काम करुन शांत बसत नव्हता तर, अन्य कैद्यांसोबत देखील त्याची वागणूक फार चांगली होती. राजपाल स्टार असल्यामुळे तो इतरांसोबत योग्य रित्या बोलणार नाही, अशी सर्वांची समज होती. पण तुरुंगात अभिनेता सर्वांसोबत आनंदाने राहात होता.

अभिनेता का होता तुरुंगात?

राजपाल यादव तुरुंगात गेल्याच्या प्रकरणाबाबत सांगायचं झालं तर, 2010 मध्ये त्याने दिग्दर्शक म्हणून ‘आता-पता लपता’ सिनेमा बनवण्यासाठी 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतलं होतं. ही रक्कम फेडता न आल्याने कर्ज देणाऱ्या व्यक्तीने कोर्टात धाव घेतली होती. 10 कोटी 40 लाख रुपये परत करणार असा करार कोर्टात झाला होता, पण तसं झालं नाही, त्यानंतर अभिनेत्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली

राजपाल यादव याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सहाय्यक अभिनेत्याची भूमिका अभिनेत्याला मिळत असली तरी, अभिनेत्याने पूर्ण मनाने भूमिका केली आणि चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही चाहते मोठ्या पडद्यावर  राजपाल याला पाहाण्यासाठी इच्छुक असतात.

सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.