प्रेम मिळवण्यासाठी १२ वर्ष झटले ‘गजोधर भैया’, निधनानंतर देखील त्यांची ‘लव्हस्टोरी’ देते कपल गोल्स
प्रेम असावं तर असं... निधनानंतर देखील त्यांच्या 'लव्हस्टोरी'ची चर्चा... फक्त झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान पक्क करण्यासाठी नाही तर, प्रेम मिळवण्यासाठी देखील राजू श्रीवास्तव यांनी केले प्रचंड प्रयत्न..
Raju Srivastava Love Story : विनोदवीर राजू श्रीवास्तव (raju srivastav) आज आपल्यात नसले तरी, त्यांच्या अनेक आठवणी चाहते आणि कुटुंबियांच्या मनात कायम आहेत. गेल्यावर्षी हृदय विकाराचा झटका आल्यामुळे ‘गजोधर भैया’ यांचं निधन झालं. दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं. राजू श्रीवास्तव यांनी फक्त झगमगत्या विश्वातच नाही तर, खासगी आयुष्यात प्रेम मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केलं. प्रेम मिळवण्यासाठी राजू श्रीवास्तव यांनी १२ वर्ष प्रयत्न केले. अखेर अनेक प्रयत्न केल्यानंतर त्यांना त्यांचं प्रेम मिळालं. आज आपण राजू यांच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेवू. (raju srivastava family)
मोठ्या भावाच्या लग्नात राजू श्रीवास्तव पहिल्या नजरेत शिखा यांच्या प्रेमात पडले. तेव्हाच राजू यांनी ठरवलं होतं की, लग्न करणार तर शिखा यांच्या सोबतच. राजू यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, पहिल्यांदा पाहिल्यानंतर राजू यांनी शिखा यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना कळालं की, शिखा त्यांच्या वहिनीच्या काकाची मुलगी आहे. (raju srivastava love story)
हळू-हळू राजू श्रीवास्तव यांनी शिखा यांच्याबद्दल सर्व माहिती काढली. तेव्हा माहिती झालं शिखा इटावा येथे राहतात. त्यानंतर राजू यांनी शिखा यांच्या भावासोबत मैत्री केली. राजू यांचं इटावा याठिकाणी जाणं वाढलं. पण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी राजू यांची हिम्मत होत नव्हती. (raju srivastava life)
राजू १९८२ साली कलाविश्वात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी मुंबईत आले. त्यानंतर राजू यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. राजू यांनी चिठ्ठीच्या माध्यमातून शिखा यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण कधीही मनातील भावना व्यक्त करू शकले नाहीत. शिखा यांनी देखील कधी समोरुन पुढाकार घेतला नाही. (raju srivastava comedy)
त्यानंतर शिखा यांच्या कुटुंबियांनी दुसऱ्या ठिकाणी मुलीचं लग्न ठरवलं. राजू यांना ही गोष्ट कळाल्यानंतर ‘गजोधर भैया’ कुटुंबियांसह शिखा यांना लग्नाची मागणी घालण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर काही दिवसांनी शिखा यांचे भाऊ मुंबईत राजू यांचं घर पाहण्यासाठी आले. अखेर १७ मे १९९३ साली राजू आणि शिखा यांचं लग्न झालं.
पूर्ण आयुष्य आपल्या विनोदबुद्धीने चाहत्यांचं मनोरंजन केल्यानंतर राजू श्रीवास्तव यांनी गेल्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर कलाविश्वात एकच खळबळ माजली. त्यांच्या निधनाने कलाविश्वाचं मोठं नुकसान झालं असं म्हणायला हरकत नाही.