Raju Srivastava: ‘वडिलांची प्रकृती स्थिर, अफवांवर विश्वास ठेवू नका’; राजू श्रीवास्तव यांच्या मुलीचं आवाहन

त्यांच्या तब्येतीविषयीची प्रत्येक अपडेट कुटुंबीय सोशल मीडियावर शेअर करत आहेत. आता राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा (Antara Srivastava) हिने वडिलांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. यासोबतच तिने चाहत्यांना आवाहनसुद्धा केलं आहे.

Raju Srivastava: 'वडिलांची प्रकृती स्थिर, अफवांवर विश्वास ठेवू नका'; राजू श्रीवास्तव यांच्या मुलीचं आवाहन
Raju SrivastavaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 12:23 PM

कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्यावर दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल आहेत. राजू लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी देशभरातील चाहत्यांकडून त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. त्यांच्या तब्येतीविषयीची प्रत्येक अपडेट कुटुंबीय सोशल मीडियावर शेअर करत आहेत. आता राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा (Antara Srivastava) हिने वडिलांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. यासोबतच तिने चाहत्यांना आवाहनसुद्धा केलं आहे. वडिलांची प्रकृती स्थिर असून ते हळूहळू बरे होत असल्याचं राजू यांच्या मुलीने सांगितलं. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन तिने चाहत्यांना केलं.

‘सर्व हितचिंतकांनो, माझे वडील राजू श्रीवास्तवजी यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते हळूहळू बरे होत आहेत. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. दिल्ली एम्स आणि राजूजींच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा. इतर कुठूनही पसरवली जाणारी बातमी विश्वासार्ह नाही. दिल्ली एम्समधील डॉक्टरांची टीम त्यांना बरं करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. आम्ही त्यांचे आणि सर्व हितचिंतकांचे आभारी आहोत. त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा’, अशी पोस्ट अंतरा श्रीवास्तवने राजू यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिली.

हे सुद्धा वाचा

10 ऑगस्ट रोजी राजू यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिममध्ये वर्कआऊट करताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. गेल्या पंधरा दिवसांपासून ते बेशुद्ध होते. ट्रेड मिलवर व्यायाम करत असताना राजू श्रीवास्तव यांना अचानक छातीत दुखू लागल्याने ते खाली पडले. सध्या ते एम्सच्या आयसीयू वॉर्डमध्ये व्हेंटिलेटरवर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली होती. मोदींनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि मदतीचं आश्वासनही दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राजू श्रीवास्तव यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली होती. राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ यांनीही कुटुंबाला मदतीचं आश्वासन दिलं आहे.

Non Stop LIVE Update
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...