Rakhi Sawant | “स्टार बनण्यासाठी आदिलने माझा वापर केला”; राखी सावंतकडून पतीची पोलखोल

बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीशी लग्न करण्यासाठी तिने इस्लाम धर्म स्वीकारला होता. सुरुवातीला आदिलने हे लग्न स्वीकारण्यास नकार दिला. मात्र नंतर पुन्हा एकदा आदिल आणि राखीला सोबत रोमान्स करताना पाहिलं गेलं.

Rakhi Sawant | स्टार बनण्यासाठी आदिलने माझा वापर केला; राखी सावंतकडून पतीची पोलखोल
राखी सावंतच्या लग्नाचे फोटो व्हायरलImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 7:33 PM

मुंबई: ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत हिच्या आयुष्यातील ड्रामा काही केल्या कमी होईना. काही दिवसांपूर्वी राखीच्या लग्नाचे फोटो अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीशी लग्न करण्यासाठी तिने इस्लाम धर्म स्वीकारला होता. सुरुवातीला आदिलने हे लग्न स्वीकारण्यास नकार दिला. मात्र नंतर पुन्हा एकदा आदिल आणि राखीला सोबत रोमान्स करताना पाहिलं गेलं. आता राखीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये ती तिच्या पतीवर फसवणुकीचा आरोप करताना दिसतेय.

पापाराझीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये राखी पुन्हा एकदा रडताना दिसतेय. पतीबद्दल बोलताना राखी त्याला इशारासुद्धा देतेय. “मी प्रामाणिकपणे इस्लाम धर्म स्वीकारला होता. मी उमराह करायला जाईन. मी 30 दिवसांचा रोजा ठेवीन. माझा अल्लाहवर विश्वास आहे आणि मी एक प्रामाणिक पत्नी आहे. तुम्ही आदिलची मुलाखत घेऊन त्याला स्टार बनवावा अशी माझी अजिबात इच्छा नाही. त्याला हेच हवंय. त्याने माझा वापर केला. त्याने मला सांगितलं होतं की तो त्या मुलीला सोडून देईलन. कुराणची शपथ त्याने घेतली होती. मात्र आदिलने त्या मुलीला ब्लॉक केला नाही आणि ती आता त्याला ब्लॅकमेल करतेय”, असं राखी म्हणाली.

हे सुद्धा वाचा

आदिलबद्दल बोलताना ती पुढे म्हणाली, “आता तर माझी आईसुद्धा नाही. मला कोणत्याच गोष्टीची भीती नाही. आदिलने माझ्यासोबत केलेलं लग्न सर्वांपासून लपवून ठेवलं आणि दुसऱ्या मुलींसोबत त्याचे अफेअर सुरू होते.” योग्य वेळ आल्यावर आदिलच्या अफेअर्सचे फोटो आणि व्हिडीओज जगासमोर आणणार असल्याचाही इशारा तिने दिला.

कोण आहे आदिल दुर्रानी?

राखी सावंतसोबत अनेकदा आदिलला पाहिलं गेलं. आदिल हा बिझनेसमन आहे. त्याच्या लिंक्ड इन प्रोफाइलनुसार, तो ‘युझ्ड कार’ या मैसूरमधील व्यवसायाचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेक महागड्या गाड्यांचे फोटो पहायला मिळतात. इन्स्टाग्रामवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. आदिल हा राखीपेक्षा वयाने 6 वर्षांनी लहान आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.