Rakhi Sawant ला बळजबरी किस करणं गायकला पडलं महागात; १७ वर्षांनंतर प्रकरण पोहचलं कोर्टात

जेव्हा प्रसिद्ध गायकाने राखी सावंत हिला सर्वांसमोर बळजबरी केलं किस....; १७ वर्षांनंतर पुन्हा याप्रकरणी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा आणि...

Rakhi Sawant ला बळजबरी किस करणं गायकला पडलं महागात; १७ वर्षांनंतर प्रकरण पोहचलं कोर्टात
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 11:42 AM

मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील राखीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामुळे राखी कायम चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असते. पण आता राखी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत असते. २००६ मध्ये प्रसिद्ध गायक मिका सिंग याने सर्वांसमोर राखीला किस केलं होतं. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. आता १७ वर्षांनंतर त्या प्रकरणाने पुन्हा डोकंवर काढलं आहे. आता मिका सिंग याने राखी सावंत हिच्याद्वारे दाखल करण्यात आलेला खटला रद्द करण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

तर दुसरीकडे राखीने देखील १७ वर्ष जुनं प्रकरण मिटवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मीकाचे वकील आणि राखीच्या वकिलांनी मिळून प्रकरण मिटवण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी आपआपसात १७ वर्ष जुनं प्रकरण मिटवलं आहे. त्यामुळे दोघांनी याप्रकरणी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

rakhi sawant

हे सुद्धा वाचा

न्यायमूर्ती एएस गडकरी आणि न्यायमूर्ती पीडी नाईक यांच्या खंडपीठासमोर सोमवारी १० एप्रिल रोजी मिका सिंगचे वकील सुनावणीसाठी आले. याप्रकरणी मीका सिंगचे वकील म्हणाले, ‘मीका आता कामत व्यस्त आहे आणि तो आता हे प्रकरण विसरला आहे. त्यामुळे दाखल करण्यात आलेली तक्रार रद्द करण्यात याला अशी मागणी केली आहे…’ सध्या १७ वर्ष जुनं हे प्रकरण तुफान चर्चेत आलं आहे.

याप्रकरणी राखी सावंत हिच्या वकिलांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. वकील आयुष पासबोला यांनी न्यायालयाला सांगितले की, राखी तिच्या कामात व्यस्त आहे, मात्र दोघांनी वाद मिटवला आहे. त्यामुळे तिने दाखल केलेली तक्रार रद्द करण्यास काहीही  हरकत नाही.

नक्की काय आहे प्रकरण?

२००६ मध्ये मीका सिंग याने वाढदिवसानिमित्त मोठ्या पार्टीचं आयोजन केलं होतं. या पर्टीमध्ये अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. राखी देखील मीकाला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचली होती. तेव्हा सर्वांसमोर मीकाने राखीला बळजबरी किस केलं. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. या घटनेनंतर राखीने पोलिसांत तक्रार देखील दाखल केली होती. तक्रारीनंतर मीकाला अटक देखील करण्यात आली होती. पण जमिनावर गायकाची सुटका झाली होती.

राखी सावंत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. राखी कायम तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असते. यामुळे राखीला ट्रोलिंगचा सामना देखील कराला लागतो.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.