‘इस्लाम कबूल करत मी फातिमा झाले’, लव्ह – जिहादबद्दल राखी सावंत हिचं मोठं वक्तव्य
आदिलसोबत लग्न केल्यानंतर राखी हिने स्वीकारला इस्लाम, लग्नानंतर राखीची फातिमा झाली, विवाहामुळे चर्चेत आलेल्या राखी सावंत हिचं लव्ह - जिहादबद्दल मोठं वक्तव्य
मुंबई : अभिनेत्री राखी सावंत कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून राखी बॉयफ्रेंड आदिल याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली आहे. राखी हिने आदिलसोबत निकाह केल्याचे फोटो पोस्ट करत सर्वांना हैराण केलं. मुस्लिम आदिल खान याच्यासोबत लग्न केल्यानंतर राखीने स्वतःचं नाव देखील बदललं आहे. आदिलसोबत निकाह केल्यानंतर अभिनेत्रीने लव्ह – जिहादबद्दल मोठं वक्यव्य केलं आहे. ज्यामुळे राखी पुन्हा चर्चेत आली आहे. राखीने निकाहनंतर इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर एका व्हिडीओच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
राखी सावंत आणि आदिल यांना विचारण्यात आलं की, दोघांचं नातं आणि लव्ह – जिहादबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत. यावर राखी म्हणाली, ‘पहिली गोष्ट तर मला माहिती नाही की लव्ह – जिहाद काय आहे. मला फक्त प्रेम काय असतं एवढंच माहिती आहे. आम्ही जात – धर्म मानत नाही. त्याने मला कबूल केलं आहे आणि मी त्याला कबूल केलं. आमच्यामध्ये धर्म नाही.’ असं अभिनेत्री म्हणाती.
View this post on Instagram
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘आम्ही निकाह केला आहे. आदिलने माझं नाव आता फातिमा ठेवलं आहे. मी इस्लाम स्वीकराला आहे आणि या गोष्टीचा मी स्वीकर करते. माझं प्रेम मिळवता यावं म्हणून मला जे करता आलं ते मी केलं. माझ्या पतीला मिळवण्यासाठी मी सर्व काही केलं आहे. ‘ असं देखील राखी म्हणाली.
दरम्यान, आदिलने १६ जानेवारी रोजी एक पोस्ट केली आणि राखीसोबत लग्न मान्य केलं. पोस्टमध्ये आदिल म्हणाला, ‘मी तुझ्यासोबत लग्न केलं नाही, असं कधीच मी म्हणालो नाही. मला काही गोष्टी स्पष्ट करायाच्या होत्या. म्हणून मी शांत होतो.’ असं म्हणत आदिलने राखीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.
राखी आणि आदिल यांनी सात महिन्यांपूर्वी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर आदिल लग्नाला नकार देत असल्याची माहिती समोर आली. दोघांच्या नात्यात अभिनेता सलमान खान याने पुढाकार घेतल्यामुळे सर्व काही सुरळीत झालं असल्याचा असा खुलासा देखील राखी आणि आदिल यांनी केला. सध्या राखी आणि आदिल त्यांच्या नात्यामुळे तुफान चर्चेत आहेत.