‘फिल्म इंडस्ट्रीमध्ये बलात्कार होत नाहीत, मुली स्वतः…’, राखी सावंतचं मोठं वक्तव्य
Rakhi Sawant | दिवसाला हजार मुली हिरोईन होण्यासाठी आलेल्या असतात, त्यांना अभिनय करायचा नसतो. फक्त निर्मात्याकडे जातात आणि.., झगमगत्या विश्वातील मोठं सत्य राखी सावंतने आणलं समोर... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राखी हिची चर्चा...

बॉलिवूडची ड्रामा क्वीन गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रकृतीमुळे चर्चेत आहे. शनिवारी राखीची ट्यूमर सर्जरी पार पडली. आता राखीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. सांगायचं झालं तर, राखी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता राखी तिच्या जुन्या मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. मुलाखतीत राखीने फिल्म इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा केला आहे. व्हिडीओमध्ये राखी निर्माते आणि अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुलींबद्दल बोलताना दिसत आहे.
राखी म्हणाली, ‘फिल्म इंडस्ट्रीमध्ये कधी बलात्कार होत नाही. मुली स्वतः नको त्या गोष्टींसाठी पुढाकार घेतात. तुम्ही आता बोलाल मी एक महिला असून असं का बोलत आहे? एका दिवसाला हजार मुली देशातील वेगवेगळ्या कोपऱ्यातून हिरोईन होण्यासाठी येत असतात. त्यांना ऑडिशन द्यायचं नसतं. अभिनय शिकायचा नसतो. डान्स शिकायचा नसतो… मुलींना काहीही शिकायचं नसतं…’
‘फक्त मेकअप, तयार होवून येतात. छोटे कपडे घालतात आणि म्हणतात सर मला काम हवं आहे. मला हिरोईन बनवा. मुली स्वतः तडजोड करण्यासाठी तयार असतात. अशात निर्माता तर फायदा घेईल, पण कॅमेऱ्यासमोर तुम्ही काय कराल… अशा परिस्थितीत मुली काय करतता तर निर्मात्याने व्हिडीओ तयार करतात.’




‘व्हिडीओ तयार केल्यानंतर सतत निर्मात्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात. असे अनेक व्हिडीओ माझ्याकडे आहेत. मग त्या मुलीला काही येत नसलं तरी निर्मात्याला तिला हिरोईन करावं लागतं. कारण त्याच्या मनात देखील भीती असते… नाव खराब होईल. पत्नी, मुलं सोडून जातील…’
पुढे राखी म्हणाली, ‘याठिकाणी मी कोणाचं नाव नाही घेणार, कारण अनेक मोठ्या व्यक्ती देखील यामध्ये सामिल आहेत. प्लेटमध्ये अन्न ठेवल्यानंतर तुम्ही खाणार कोणी नकार नाही देणार…’ असं देखील राखी सावंत म्हणाली.
एवढंच नाही तर मुलींना अभिनेत्री म्हणाली, ‘मी मुलींना कायम सांगते 100 ठिकाणी जा. ऑडिशन द्या. शॉर्ट कपडे घाला. पण शॉर्टकटने जाऊ नका… टीव्हीवर छोटे कपडे घाला… खऱ्या आयुष्यात छोटे कपडे घाला… मी देखील घरातून निघताना विथआऊट मेकअप निघत नाही. कारण तुम्ही मला पाहू देखील शकणार नाही. मी पूर्ण तयार होऊन बाहेर निघते. कारण माझं पोट आहे त्यावर…’ राखी हिचा व्हिडीओ जुना असला तरी तुफान व्हायरल होत आहे.