राखी सावंतच्या ‘त्या’ कमेंटमुळे मलायकाला लागली मिर्ची; दिलं होतं सडेतोड उत्तर

मलायकाला खटकली होती राखी सावंतची 'ती' टिप्पणी; सलमानचा उल्लेख करत दिलं उत्तर

राखी सावंतच्या 'त्या' कमेंटमुळे मलायकाला लागली मिर्ची; दिलं होतं सडेतोड उत्तर
Rakhi Sawant and Malaika AroraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 5:28 PM

मुंबई- अभिनेत्री मलायका अरोराला अभिनयक्षेत्रात यश मिळालं नसलं तरी बॉलिवूडमधल्या हिट गाण्यांवर ती थिरकली आहे. आयटम साँग्सद्वारे मलायकाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या 24 वर्षांच्या करिअरमध्ये मलायकाने काही चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र तिला ‘छैय्या छैय्या’, ‘मुन्नी बदनाम हुई’, ‘अनारकली डिस्को चली’ यांसारख्या गाण्यांमुळे जास्त प्रसिद्धी मिळाली. मलायकाने सलमान खानच्या ‘दबंग’ आणि ‘दबंग 2’मध्येही आयटम साँग्स केले आहेत. यावरून अभिनेत्री राखी सावंतने मलायकावर निशाणा साधला होता. राखीच्या एका कमेंटनंतर मलायका आणि तिच्यात शीतयुद्ध निर्माण झालं होतं.

ही घटना मलायकाच्या घटस्फोटापूर्वीची आहे. राखी सावंतने मलायकाच्या करिअरवरून कमेंट केली होती. “मलायकाला आयटम गर्ल यासाठी म्हटलं जात नाही, कारण ती सलमान खानच्या कुटुंबाचा भाग आहे”, असं ती म्हणाली होती. मलायकाला ही बाब खूप खटकली होती. त्यावर तिने राखीला सडेतोड उत्तरदेखील दिलं होतं.

हे सुद्धा वाचा

मलायका अरोराने 2008 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत राखीला उत्तर देताना म्हटलं, “मग तर मी सलमानच्या प्रत्येक चित्रपटात असायला पाहिजे. त्याच्या प्रत्येक खास गाण्यामध्ये माझी एण्ट्री असायला पाहिजे. सलमान खानने मला बनवलं नाही. मी स्वत:च्या दमावर या इंडस्ट्रीत आहे.”

मलायकाने वीजे म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘दिल से’ या चित्रपटातील ‘छैय्या छैय्या’ गाण्यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. सध्या मलायका छोट्या पडद्यावर सक्रिय आहे. विविध डान्स रिअॅलिटी शोजमध्ये ती परीक्षक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येते.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.