Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत लोक मरत आहेत आणि आयपीएल काय खेळताय?; राखी सावंत भडकली

अभिनेत्री राखी सावंत ‘ड्रामा क्वीन’ म्हणून मनोरंजन विश्वात प्रसिद्ध आहे. ती काहीना काही कारणाने नेहमीच चर्चेत असते.

मुंबईत लोक मरत आहेत आणि आयपीएल काय खेळताय?; राखी सावंत भडकली
राखी सावंत
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 4:43 PM

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ‘ड्रामा क्वीन’ म्हणून मनोरंजन विश्वात प्रसिद्ध आहे. ती काहीना काही कारणाने नेहमीच चर्चेत असते. आता राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. देशामध्ये सुरू असलेल्या आयपीएलवर राखी भडकली आहे. मुंबईमध्ये कोरोना रूग्णांची वाढलेली संख्या आणि यादरम्यान सुरू असलेले आयपीएलचे सामने यावर राखीने चांगलाच समाचार घेतला आहे. मुंबईमध्ये लाॅकडाऊन आहे मग आयपीएलचे सामने कसे सुरू असा प्रश्न देखील राखीने उपस्थित केला आहे. (Rakhi Sawant got angry as the IPL was still going on during the Corona period)

राखीला जेंव्हा विचारण्यात आले की, तुम्ही आयपीएल पाहात आहेत का? त्यावेळी राखी म्हणाली की, इथे मुंबईत लोक मरत आहेत, आयुष्य थांबले आहे आणि इथे आयपीएल खेळले जात आहे वा…पुढे राखी म्हणाली की, इथे कोणीही नाही सर्वजन मुंबईच्या बाहेर सहलीला गेले आहे. तुम्हाला मी एकटीच मिळेल.राखी सावंतने काही दिवसांपूर्वी आईचे दोन फोटो शेअर केले होते. या फोटोत राखीच्या आजारी आईचीच्या वेदना स्पष्टपणे दिसून येत होत्या.

राखी सावंतने आपल्या आईचे फोटो शेअर केले होते आणि प्रियजनांना आईसाठी प्रार्थना करण्यास सांगितले होते. फोटो शेअर करताना राखीने लिहिले होते की, प्लीज, माझ्या आईसाठी प्रार्थना करा, तिच्यावर सध्या कर्करोगाचे उपचार सुरू आहे. सर्वाधिक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’ च्या 14 व्या सीझनमध्ये राखी सावंतच्या एन्ट्रीमुळे हा कार्यक्रम बर्‍यापैकी रंजक झाला होता.

या शोमध्ये राखीने तिच्या चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले आणि शोच्या टॉप-5 फायनलिस्टमध्ये देखील तिने आपले स्थान निश्चित केले होते. त्याचबरोबर शोच्या फिनालेमध्ये राखी सावंतने 14 लाख रुपये घेऊन शोमधून बाहेर पडत सर्वांनाच चकित केले होते. ‘बिग बॉस 14’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या राखी सावंतने या घरात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. या घरात तिने पती रितेश याच्याबद्दलही अनेक मोठे खुलासे केले होते.

आता ती पुन्हा रितेशशीच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. ती सध्या रितेशच्या संपर्कात असल्याचे तिचे म्हणणे आहे. आता राखी अभिनवला विसरली असल्याचे दिसते आहे. ‘बिग बॉस 14’च्या घरात राखी अभिनव शुक्लासोबत (Abhinav Shukla) लग्न करण्याबद्दलही बोलली होती. इतकेच नाही तर, या घरात रुबिना अर्थात अभिनवची पत्नी असतानाही राखीने अभिनवसमोर अनेक वेळा आपले प्रेम व्यक्त केले होते.

संबंधित बातम्या : 

Sonu Sood Corona | Sonu Sood Corona | कोरोना काळात लाखो गरजवंतांना मदत, बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण

परिणीती चोप्राच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज! ‘सायना’ लवकरच अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार

(Rakhi Sawant got angry as the IPL was still going on during the Corona period)

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.