Video | पतीसोबत वाद सुरू असतानाच राखी सावंत हिजाब घालून निघाली उमराह करायला, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. राखी सावंत हिच्यावर तिच्या पतीने काही गंभीर आरोप केले. अगोदर राखी सावंत हिने देखील आदिल दुर्रानी याच्यावर आरोप केले. राखी सावंत हिच्या आयुष्यामध्ये मोठे वादळ आले आहे.
मुंबई : राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच राखी सावंत (Rakhi Sawant) हिने आदिल दुर्रानी खान नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केले. मात्र, त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर काही महिने आदिल दुर्रानी (Adil Durrani) याला जेलमध्ये राहण्याची वेळ आली. आदिल दुर्रानी हा नुकताच जेलबाहेर आलाय. त्याने जेलमधून बाहेर येताच सांगितले की, मी आता राखी सावंत हिची सर्व पोलखोल ही करणार आहे.
आदिल दुर्रानी याने एक प्रेस घेत राखी सावंत हिच्यावर अनेक गंभीर आरोप हे केले. त्यामध्ये आदिल दुर्रानी याने सांगितले की, राखी सावंत ही कधीच आई बनू शकत नाही. तिने मला खोटे सांगितले होते की, ती माझ्या बाळाची आई होणार आहे. इतकेच नाही तरी राखी सावंत हिने तिच्या आईच्या निधनानंतर हाॅपीस्टलमध्ये बिर्यानी खाली असल्याचे देखील त्याने म्हटले.
राखी सावंत हिची मैत्रीण राजश्री मोरे हिने देखील राखी सावंत हिच्यावर गंभीर आरोप केले. राखी सावंत हिने आपल्याला धमकी दिल्याचे सांगत राजश्री मोरे हिने तक्रार दाखल केली. यानंतर आदिल दुर्रानी, राजश्री मोरे आणि शर्लिन चोप्रा यांनी एक प्रेस घेत राखी सावंत हिच्याबद्दल काही मोठे खुलासे हे केले.
View this post on Instagram
या आरोपांवर स्पष्टीकरण देताना देखील राखी सावंत दिसली आहे. आयुष्यामध्ये हे सर्वकाही सुरू असतानाच आता नुकताच राखी सावंत ही उमराह करण्यासाठी निघाली आहे. राखी सावंत हिने विमानामधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत हिने सांगितले की, आपण उमराह करण्यासाठी जात आहोत.
काही दिवसांपूर्वीच पापाराझी यांना बोलताना राखी सावंत हिने म्हटले की, मी आदिल दुर्रानी याची जेलमधून बाहेर येण्याची वाट पाहत आहे. कारण मला आता त्याच्यासोबत घटस्फोट घ्यायचा आहे. माझे काम इतके जास्त वाढले आहे की, मला एका चांगल्या जीवनसाथीची गरज आहे. त्यासाठी मला याच्याकडून घटस्फोट घ्यायचा आहे.
राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न केल्यानंतर इस्लाम धर्म स्वीकारला आहे. लग्नानंतर राखी सावंत हिने जाहीर केले की, तिचे नाव फातिमा आहे. राखी सावंत हिने आता म्हटले आहे की, मी आदिल दुर्रानी याच्यासोबत घटस्फोट घेणार नाहीये आणि तो माझ्यामुळे सहा महिने जेलमध्ये राहिला नव्हता. एका दुसऱ्या मुलीने त्याच्यावर केस केली होती.