सर्जरीनंतर बिघडली राखी सावंतची तब्येत; जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा पूर्व पतीचा आरोप

मुंबईतल्या एका रुग्णालयात अभिनेत्री राखी सावंतवर सर्जरी करण्यात आली. तिच्या पोटात ट्युमर होता आणि सर्जरी करून हा ट्युमर काढण्यात आला. तो कॅन्सरचा होता का, याबाबतचा तपास डॉक्टर करत आहेत. तिच्या प्रकृतीविषयी रितेशने माहिती दिली आहे.

सर्जरीनंतर बिघडली राखी सावंतची तब्येत; जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा पूर्व पतीचा आरोप
Rakhi SawantImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 22, 2024 | 10:29 AM

टेलिव्हिजनची ‘ड्रामा क्वीन’ अर्थात अभिनेत्री राखी सावंत सध्या रुग्णालयात दाखल आहे. नुकतीच तिच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. राखीच्या गर्भाशयात ट्युमर होता. त्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करून तो ट्युमर काढण्यात आला. तो ट्युमर कॅन्सरचा होता की नाही, याचा तपास सध्या डॉक्टर करत आहेत. राखीवर जवळपास तीन तास सर्जरी करण्यात आली होती. ही सर्जरी यशस्वी ठरली तरी राखी शुद्धीवर आली नाही. गेल्या काही दिवसांपासून राखीसोबत तिचा पूर्व पती रितेश सिंह आहे. राखीची प्रकृती अद्याप ठीक नाही, तिला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे, असं त्याने सांगितलं. पुढील पंधरा दिवस ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली असेल. राखीच्या गर्भाशयातील ट्युमर जर कॅन्सरचा असेल तर तिला किमो आणि इतर उपचारसुद्धा घ्यावे लागतील.

काय म्हणाला राखीचा पूर्व पती?

“आम्ही देवाकडे प्रार्थना करतोय की तो ट्युमर कॅन्सरचा असू नये. जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर आम्ही तिला उपचारासाठी परदेशात घेऊन जाऊ. मी एक पूर्व पती म्हणून नाही तर मित्र म्हणून राखीची काळजी घेतोय”, असंदेखील रितेश म्हणाला. यासोबतच त्याने राखीला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचाही खुलासा केला आहे. याप्रकरणी त्याने पोलिसांकडे तक्रार केली आहे. रितेशन अप्रत्यक्षपणे राखीचा पूर्व पती आदिल खान दुर्रानीवर आरोप केले आहेत. “हे सर्वांनाच माहीत आहे की आमचा शत्रू कोण आहे? मी त्या व्यक्तीविरोधात तेव्हाच बोलेन, जेव्हा माझ्याकडे पुरावे असतील. आम्ही मीडिया ट्रायल करणार नाही, थेट पोलिसांची मदत घेऊ”, असंही रितेशने स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

राखी सावंतच्या वकिलांनीही तिला सतत धमक्या येत असल्याचं म्हटलं आहे. ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत राखीच्या वकील फाल्गुनी यांनी सांगितलं की तिला जीवे मारण्याच्या धमक्यांचे मेसेज आणि कॉल्स येत आहेत. राखीला डिस्चार्ज मिळताच ती सर्वांत आधी त्याविषयी पोलिसांकडे तक्रार करेल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

राखीची प्रकृती बिघडल्याने तिला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर रुग्णालयातील तिचे काही फोटो व्हायरल झाले होते. राखीचा हा काही पब्लिसिटी स्टंट किंवा नवीन ड्रामा असावा असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले होते. मात्र तिची तब्येत खरीच बिघडली असल्याचं रितेशने स्पष्ट केलं.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.