Rakhi Sawant | “डॉक्टरांनी नकार दिल्यानंतर त्याने माझ्यासोबत..”; प्रेग्नंसीबाबत राखी सावंतचा नवीन खुलासा

राखीचा हा नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. बिग बॉस मराठीदरम्यान राखीला समजलं होतं की ती गरोदर आहे. मात्र त्याच्या काही काळानंतर लगेचंच राखीचा गर्भपात झाला.

Rakhi Sawant | डॉक्टरांनी नकार दिल्यानंतर त्याने माझ्यासोबत..; प्रेग्नंसीबाबत राखी सावंतचा नवीन खुलासा
Rakhi SawantImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 11:33 AM

मुंबई : ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीने तिचा पती आदिल खान दुर्रानीवर बरेच आरोप केले आहेत. आदिलला पोलिसांनी अटक केली असून तो सध्या कोठडीत आहे. सुरुवातीला राखीने आदिलवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला. त्यानंतर आता डॉक्टरांनी सांगितल्यानंतरही आदिलने माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि त्यामुळे मी प्रेग्नंट झाले होते, असा खुलासा राखीने केला आहे. राखीचा हा नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. बिग बॉस मराठीदरम्यान राखीला समजलं होतं की ती गरोदर आहे. मात्र त्याच्या काही काळानंतर लगेचंच राखीचा गर्भपात झाला.

“बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी माझं एक ऑपरेशन झालं होतं. मला त्यांनी सांगण्यास नकार दिला होता. मात्र आता मी शांत बसणार नाही. माझा खूप मोठा ऑपरेशन झाला होता आणि त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं होतं की तीन महिन्यांपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. मात्र तो 10 दिवससुद्धा थांबू शकला नव्हता. डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की जर आता तू प्रेग्नंट राहिलीस तर तुझ्या प्रकृतीसाठी ते ठीक नसेल. तुझ्या जीवालाही धोका आहे”, असं राखी या व्हिडीओत म्हणते.

हे सुद्धा वाचा

यापुढे ती म्हणते, “तुम्ही बिग बॉस मराठी पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की मी म्हटलं होतं, मी गरोदर आहे. तुमच्याकडे ते फुटेज असेल तर काढून पहा. मी प्रेग्नंट होती, मात्र जेव्हा बिग बॉसच्या घराबाहेर आली तेव्हा त्याने माझ्याशी लग्न करण्यास नकार दिला. तेव्हाच माझा गर्भपात झाला.”

राखीने याआधीही एकदा ऑपरेशनचा उल्लेख केला होता. सप्टेंबर 2022 मध्ये गर्भाशयावर गाठ झाल्याने तिच्यावर सर्जरी करण्यात आली होती. राखीच्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलिसांनी 7 फेब्रुवारी रोजी आदिलला अटक केली होती. राखीने आदिलवर मारहाण, अनैसर्गिक शारीरिक संबंध, विवाहबाह्य संबंध असे आरोप केले आहेत. कोर्टाने सध्या आदिलला 20 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.