Rakhi Sawant | राखी सावंतने स्वत:च्याच वाजवली कानाखाली; पुन्हा एकदा हाय व्होल्टेड ड्रामा

एकीकडे तिचा पती आदिल खान दुर्रानीला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरीकडे पापाराझींसमोर बोलताना राखीने स्वत:च्याच कानाखाली मारून घेतली आहे. ढसढसा रडत ती म्हणाली "मीसुद्धा फ्रिजमध्ये जाणार होती, मात्र वाचले." राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Rakhi Sawant | राखी सावंतने स्वत:च्याच वाजवली कानाखाली; पुन्हा एकदा हाय व्होल्टेड ड्रामा
Rakhi SawantImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 10:52 AM

मुंबई : टेलिव्हिजनवरील ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. राखी सावंतकडून दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. एकीकडे तिचा पती आदिल खान दुर्रानीला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरीकडे पापाराझींसमोर बोलताना राखीने स्वत:च्याच कानाखाली मारून घेतली आहे. ढसढसा रडत ती म्हणाली “मीसुद्धा फ्रिजमध्ये जाणार होती, मात्र वाचले.” राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पापाराझींसमोर बोलताना राखी हमसून हमसून रडू लागली आणि स्वत:च्याच कानाखाली मारू लागली. “मी आदिलवर प्रेम का केलं”, असं ती म्हणाली. राखीने याआधीही फ्रिजचा उल्लेख केला होता. दिल्लीतील श्रद्धा वालकर प्रकरणात तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर जंगलात फेकण्यात आले होते. त्यावरूनच राखी वारंवार हे म्हणताना दिसली की तिचीसुद्धा तीच अवस्था झाली असती.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Showbiz Spy (@showbizspy_)

आदिल सध्या न्यायालयीन कोठडीत असून राखीने त्याची नुकतीच भेट घेतली. मात्र या भेटीदरम्यान तो अत्यंत उद्धटपणे बोलला, असं राखीने सांगितलं. राखी आणि आदिलच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून विविध समस्यांना सुरुवात झाली आहे. सुरुवातीला आदिलने लग्न स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र नंतर त्याने पोस्ट लिहित त्यामागील कारण स्पष्ट केलं.

राखी आणि आदिलच्या लग्नाचा हा ड्रामा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. राखीने तिच्या पतीवर फसवणूक, पैसे हडपल्याचा आणि विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला. तिच्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलिसांनी आदिलला अटक केली.

बिग बॉस मराठीच्या घरात असताना राखीने आदिलला काही पैसे दिले होते. हे पैसे तिने तिच्या आजारी आईच्या उपचारासाठी त्याच्याकडे दिले होते. काही दिवसांपूर्वीच राखीच्या आईचं कॅन्सर आणि ब्रेन ट्युमरने निधन झालं. त्यानंतर राखीने आदिलवर तिचे पैसे हडपल्याचा आरोप केला आहे. “मी त्याला विचारलं की माझे 1 कोटी 60 लाख रुपये त्याने कुठे ठेवले आहेत? मी त्याला नव्या कारविषयीही प्रश्न विचारला. मात्र तो माझ्याशी नीट बोलला नाही. तुला काय करायचंय असं उत्तर त्याने दिलं. मी सुद्धा त्याला माफ करणार नाही”, असं राखी म्हणाली होती.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.