Rakhi Sawant I शाहरुख खान याला राखी सावंत म्हणाली मैं हूं ना… दुखापतीबद्दल व्यक्त केली चिंता
राखी सावंतचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला असून त्यामध्ये ती शाहरुख खानच्या दुखापतीबद्दल बोलताना दिसत आहे. तिने शाहरुखला एक ऑफरही दिली आहे.

मुंबई : बॉलिवूडमधील ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. लोकांचं लक्ष वेधून घेणं तिला बरोबर जमतं, त्यासाठी तिचे सतत उद्योग सुरु असतात. ते पाहून काहीवेळा तर हैराण व्हायला होतं.
राखी नुकतीच दुबईहून परतली असून तिचे एकामागोमाग एक असे व्हिडीओ दिसत आहेत. नुकताच तिचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तिने पायात चप्पल घातली नसल्याचे दिसून आले. तिने असे का केले हे विचारण्यात आले असता राखी म्हणाली होती की तिने सलमान खानच्या लग्नासाठी नवस मागितला. जोपर्यंत सलमान लग्न करणार नाही, तोपर्यंत पायात अजिबात चप्पल घालणार नसल्याचे तिने स्पष्ट केले होते.
यानंतर आता तिचा नवा व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये ती बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) बद्दल बोलताना दिसत आहे. यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
शाहरुख बद्दल राखी म्हणाली…
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत राखी शाहरुख बद्दल बोलत होती. शूटिंग करताना शाहरूखला दुखापत झाल्याचे फोटोग्राफर्सनी तिला सांगितला. त्याचा नाकाला लागल्याचे ते म्हणाले. यावर राखी म्हणाली ‘शाहरुखचं नाक तुटलं का ?’ तेव्हा फोटोग्राफर्स म्हणाले ही मजा नाहीये, त्याला खरंच लागलंय, त्याची सर्जरीही झाली आहे. त्यावर चिंता व्यक्त करत राखी म्हणाली, ‘ अरे बापरे… I love you Shah rukh. जर डॉक्टर (दुखापत) बरं नाही करू शकले तर मी आहे ना. मी तिथे येईन आणि तुझ्या जखमेवर मलम लावेन. तुझं नाक आणि सगळं (दुखापत) बरं होईल ‘ अशा ड्रामॅटिक अंदाजात राखी बोलत होती.
View this post on Instagram
शूटिंग करताना झाली दुखापत
अभिनेता शाहरुख खान हा लॉस अँजिलिस येथे त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी शूटिंग करत असताना त्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली होती. सेटवरील अपघातानंतर अमेरिकेतच शाहरुखवर सर्जरी करण्यात आल्याचेही वृत्त होते. या चर्चांदरम्यान शाहरुख बुधवारी मुंबईत परतला. दुखापतीनंतर त्याची सर्जरी झाली व नाकावर बँडेज असल्याचं म्हटलं गेलं होतं. मात्र विमानतळावर तो नेहमीप्रमाणे फिट अँड फाइन दिसत होता. त्याच्यासोबत पत्नी गौरी आणि मुलगा अबरामसुद्धा होता.