Rakhi Sawant | लव्ह जिहादवर राखीने सोडलं मौन; बेबी प्लॅनिंगचंही सांगितलं सत्य, कॅमेरासमोर पडली बेशुद्ध

राखीने नुकतंच तिच्या पतीवर मारहाणीचा आणि विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला. तिने पती आदिल खान दुर्रानीविरोधात एफआयआरसुद्धा दाखल केली होती. ज्यानंतर ओशिवरा पोलिसांनी आदिलला अटक केली.

Rakhi Sawant | लव्ह जिहादवर राखीने सोडलं मौन; बेबी प्लॅनिंगचंही सांगितलं सत्य, कॅमेरासमोर पडली बेशुद्ध
Rakhi SawantImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 1:45 PM

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रा राखी सावंत तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच राखीच्या आईचं निधन झालं. त्यानंतर आता तिच्या वैवाहिक आयुष्यात बऱ्याच समस्या निर्माण झाल्याचं दिसतंय. राखीने नुकतंच तिच्या पतीवर मारहाणीचा आणि विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला. तिने पती आदिल खान दुर्रानीविरोधात एफआयआरसुद्धा दाखल केली होती. ज्यानंतर ओशिवरा पोलिसांनी आदिलला अटक केली. या सर्व वादादरम्यान मंगळवारी माध्यमांशी बोलताना राखी अचानक बेशुद्ध पडली.

ओशिवरा पोलीस ठाण्याबाहेर राखी माध्यमांशी बोलत होती, तेव्हा ती अचानक बेशुद्ध पडली. तिथे उपस्थित असलेल्यांनी राखीला उचचलं आणि तिला पाणी पाजलं. मात्र राखीची तब्येत जरा जास्तच बिघडली होती. राखीसोबत असलेल्या काही लोकांनी तिला गाडीमध्ये बसवलं आणि तिथून तिला घरी नेण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

“मीडिया आणि जगाच्या भीतीने मी सर्वकाही सहन करत राहिली. लोक म्हणतील की दुसरं लग्न आहे आणि हेसुद्धा टिकू शकलं नाही. लोक माझ्यावरच आरोप करतील, म्हणून मी सर्वकाही मुकाट्याने सहन करत गेले. गेल्या आठ-नऊ महिन्यांच्या या संसारात मी आदिलला जवळपास 50 वेळा माफ केलं असेन”, असं राखी म्हणाली.

राखीने यावेळी असाही दावा केला की ती आदिलसोबत ‘बेबी प्लॅन’ करत होती. साढे चार महिन्यांपूर्वी बाळासाठी तिचं एक ऑपरेशन झाल्याचंही राखीने सांगितलं. मात्र आदिलने सर्वकाही उद्ध्वस्त केल्याचा आरोप तिने केला. “जर मी तुझ्या जागी असते तर मी तिला कधीच सोडून दिलं असतं, असं त्याची आई त्याला सतत म्हणायची”, असंही राखीने पुढे सांगितलं.

लव्ह जिहादच्या प्रश्नावर राखीने साफ नकार दिला. तर तिच्यासोबत असलेली एक व्यक्ती म्हणाली, “यात लव्ह जिहादचा कोणताच अँगल नाही. हे सर्व चुकीचं आहे. ही फक्त एक कौटुंबिक समस्या आहे.”

राखी आणि आदिलचं लग्न

राखी आणि आदिलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून ही जोडी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. सुरुवातीला आदिलने हे लग्न स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हासुद्धा राखीने त्याच्यावर आरोप केले होते. नंतर काही दिवसांनी आदिल आणि राखी पुन्हा एकमेकांसोबत प्रेमाने वागताना दिसले.

आदिल राखीला घास भरवतानाचा व्हिडीओ व्हायरल

गेल्या आठवड्यात राखीने पापाराझींसमोर आदिलवर विवाहबाह्य संबंध असल्याचाही आरोप केला होता. आदिलच्या गर्लफ्रेंडचं नावसुद्धा तिने एका व्हिडीओतून जाहीर केलं होतं. या सर्व वादादरम्यान सोमवारी राखी आणि आदिल हे त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत डिनरला गेल्याचं पहायला मिळालं. सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये आदिल राखीला त्याच्या हाताने जेवण भरवातना दिसतोय.

आदिलसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राखीने त्यावर कमेंट केली. ‘होय, तो माफी मागायला आला होता, मात्र मी कधीच त्याला माफ करणार नाही’, असं तिने लिहिलं होतं.

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.