मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) मध्ये घरातील सदस्यांना एक नवीन टास्क देण्यात आला आहे. या टास्कमधून घराचा नवीन कॅप्टन निवडला जाणार आहे. टास्कमध्ये राखी सावंत आणि सोनाली फोगाट ह्या कॅप्टनपदासाठी दावेदार आहेत. सोनाली फोगाटला अली गोनीची बहीण आणि राहुल वैद्य यांच्या आईची मते मिळाली पण सोनालीच्या मुलीला मतदान करता आले नाही. सोनालीला हे तिसरे मत मिळाले असते, तर तिचा आणि राखीचा टास्क परत झाला असता. यामुळे राखी सावंत बिग बॉसच्या घराची नवीन कॅप्टन बनणार आहे. (Rakhi Sawant will be the new captain of Bigg Boss’s house)
Did you know @ashukla09 ko saree pehnana bhi aata hai? Dekhiye aaj unhe bante hue #RakhiSawant ke helping hand!
Watch #BB14 tonight at 10:30 PM.
Catch it before TV on @VootSelect @BeingSalmanKhan #BiggBoss2020 #BiggBoss #BiggBoss14 pic.twitter.com/hPfDjat9pk— Bigg Boss (@BiggBoss) January 8, 2021
दुसरीकडे, जास्मीनचे आई-वडिलांनी तिला अलीपासून दुर राहण्यासाठी सांगितले आणि अलीच्या मदतीने खेळ नको खेळू तर स्वतःचा खेळ खेळायला सांगितला आहे. हे ऐकून अलीला राग आला आहे. कालच्या भागात अलीची बहिण भेटली होती. त्यावेळी तिने जास्मीनचे खूप कौतुक केले होते.
राखी सावंत बिग बॉस घरातील सर्वात मनोरंजण करणारी स्पर्धक आहे. शोमध्ये ती बर्याचदा सर्वांना हसवते. पण गेल्या काही दिवसांपासून तिचे लक्ष अभिनव शुक्लावर आहे. आजच्या एपिसोडमध्ये राखी अभिनवला साडी नेण्यास सांगणार आहे. कलर्स टीव्हीने नुकताच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो, राखी म्हणते, “आज मी अभिनवकडून साडी नेसणार आहे.” अभिनव म्हणतो, “हो मी तयार आहे.” ‘मग अभिनव राखीला साडी घालायला लागला.
संबंधित बातम्या :
Bigg Boss 14 | राखी सावंतने केले जास्मीन आणि अलीच्या नात्यावर मोठे भाष्य!
Bigg Boss 14 Promo | बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा अर्शी खानचा ड्रामा!
Bigg Boss 14 | राखीवर राहुल महाजनची टिप्पणी, बिग बॉसच्या घरात जोरदार हंगामा!
(Rakhi Sawant will be the new captain of Bigg Boss’s house)