पुन्हा लग्न करणार राखी सावंत? तुरुंगात असलेला पती आदिल खान याच्याबद्दल म्हणाली…

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पती आदिल खान यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर तो तुरुंगात असताना राखी नवरीच्या रुपात दिसली आहे.

पुन्हा लग्न करणार राखी सावंत? तुरुंगात असलेला पती आदिल खान याच्याबद्दल म्हणाली...
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 9:51 AM

Rakhi Sawant : अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखी कायम तिच्या खासगी आयुष्याबद्दल माध्यमांसमोर मोठे खुलासे करताना दिसते. राखी हिने पती आदिल खान (Adil Khan Durrani) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्यामुळे आदिल सध्या तुरुंगात आहे. अशात राखी नव्या नवरीच्या रुपात सर्वांसमोर आल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. अनेकांनी राखीला नव्या लूकमुळे ट्रोल केलं आहे. लग्नात चढ – उतार आल्यानंतर राखी पुन्हा विवाहबंधनात अडकणार का? अशा चर्चा आता रंगत आहेत. तर रंगणाऱ्या चर्चांवर खुद्द राखी सावंत हिने मोठा खुलासा केला आहे.

दरम्यान, राखी आता खासगी आयुष्याला बाजूला सारत पुन्हा कामावर पोहोचली आहे. राखी पुन्हा नवरी झाली आहे. पण रियल आयुष्यात नाही तर, रिल आयुष्यात. आगामी म्यूझीक व्हिडीओसाठी राखी नव्या नवरीच्या रुपात तयार झाली आहे. सध्या राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (rakhi sawant husband)

व्हिडीओमध्ये राखी माध्यमांसोबत बोलताना देखील दिसत आहे. पापाराझी राखीला विचारतात की, तू पुन्हा लग्न करणार आहेस… यावर राखी म्हणते, ‘नाही… झालं एकदा लग्न झालं आहे. दुसऱ्यांदा मी कधीही लग्न करणार नाही. आता थेट स्मशानभूमीत जाईल पण लग्न करणार नाही. माझा एक पती आहे आणि तो तुरुंगात आहे…’ सध्या राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओ पाहून अनेकांनी राखीला ट्रोल देखील केलं आहे. एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘नवरी याठिकाणी आहे आणि नवरा तुरुंगात आहे.’ तर अनेकांनी राखीला तुझं दुसरं लग्न आहे… अशी आठवण करून दिली. एक अन्य युजर कमेंट करत म्हणाला, ‘एक वेळा नाही मॅडम रितेशला विसरली का?’ असं म्हणत अनेक जण राखीला ट्रोल करत आहेत. (rakhi sawant marriage)

काही दिवसांपूर्वी आदिल खान (Adil Khan Durrani) याच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करणारी राखी हिने पतीवर गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी राखी सतत पोलीस आणि न्यायालयात धाव घेत आहे. पती आदिल खान याला जामिन न मिळावा म्हणून राखी पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राखीने आदिलवर गंभीर आरोप केले होते, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

राखी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी राखीच्या आईचं निधन झालं. तेव्हा आईच्य निधनाची बातमी राखीने एक व्हिडीओ पोस्ट करत दिली. सोशल मीडियावर राखी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. त्यामुळे राखी आणि आदिल प्रकरणात पुढे काय होणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.