मुंबई : राखी सावंत ही नेहमीच चर्चेत असते. बिग बाॅस मराठीमधून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत (Rakhi Sawant) हिने सर्वांना मोठा धक्का देत तिच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर केले. विशेष म्हणजे राखी सावंत हिने हे फोटो शेअर करण्याच्या अगोदर तब्बल सात महिन्यांपूर्वीच तिचे लग्न हे आदिल दुर्रानी (Adil Durrani) याच्यासोबत झाले. मात्र, आदिल दुर्रानी यानेच आपल्याला लग्नाची गोष्ट ही सर्वांपासून लपवून ठेवण्यास सांगितल्याचे राखी हिने म्हटले. राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न (Marriage) केल्यानंतर इस्लाम धर्म स्वीकारला. आदिल दुर्रानी याच्यासोबतच्या लग्नानंतर राखी सावंत हिने तिचे नाव फातिमा असल्याचे सांगितले.
काही दिवस राखी सावंत हिचा संसार सुखी सुरू होता. मात्र, अचानक आदिल दुर्रानी याच्यावर राखी हिने काही गंभीर आरोप केले. राखी सावंत हिने केलेले आरोप ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. यांचे प्रकरण थेट कोर्टात जाऊन पोहचले आहे. राखी सावंत हिचा पती आदिल दुर्रानी हा सध्या जेलमध्ये आहे. राखी हिने आदिल दुर्रानीवर अनेक आरोप केले आहेत.
नुकताच राखी सावंत हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. राखी सावंत हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. राखी सावंत ही या व्हिडीओमध्ये डान्स क्लबमध्ये गेल्याचे दिसत आहे. अत्यंत बोल्ड लूकमध्ये राखी सावंत दिसत असून धमाकेदार डान्स करताना राखी सावंत ही दिसतंय. राखी सावंत हिचा लूक तिच्या चाहत्यांना आवडलाय.
राखी सावंत हिच्या भोवती बरेच लोक दिसत असून दुनिया दिवानी है या गाण्यावर डान्स करताना राखी सावंत ही दिसत आहे. राखी सावंत हिने शेअर केलेल्या व्हिडीओनंतर अनेकांनी तिला ट्रोल करण्यास देखील सुरूवात केली आहे. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, बघा आता ही फातिमा. दुसऱ्याने लिहिले की, ही फक्त नाटक चांगल्या प्रकारे करते.
तिसऱ्याने लिहिले की, फातिमा कुठे गेली, तू मुस्लिम नाहीस…एकीकडे राखी सावंत हिला या व्हिडीओमुळे ट्रोल केले जात आहे तर दुसरीकडे राखी सावंत हिला असे बिनधास्त पाहून तिचे चाहते आनंदी झाल्याचे दिसत आहे. आदिल दुर्रानी याने आपल्याला धोका दिल्याचे देखील राखी सावंत हिने अनेकदा म्हटले आहे. आपल्याशी लग्न केल्यानंतरही आदिल दुर्रानी याचे तनू नावाच्या मुलीसोबत अफेअर सुरू असल्याचे राखी हिने म्हटल होते.