तिला एवढा भयंकर आजार असेल असं… राखी सावंत हिचा पूर्वीचा नवरा प्रचंड दु:खी
Poonam Pandey Death News : पूनम पांडे हिच्या निधनानंतर सर्वजण हैराण झालेत. हेच नाही तर सोशल मीडियावर पोस्ट करत अनेकांनी दु:ख व्यक्त केले. पूनम पांडे हिने बाॅलिवूड चित्रपटातून करिअरची सुरूवात केली. हेच नाही तर पूनम पांडे ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. सोशल मीडियावर देखील पूनम पांडे सक्रिय होती.
मुंबई : पूनम पांडे हिच्या निधनानंतर अनेकजण हैराण झालेत. पूनम पांडे हिच्या जवळचे लोक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त करताना दिसत आहेत. अवघ्या 32 व्या वर्षी पूनम पांडे हिने शेवटचा श्वास घेतला. पूनम पांडे हिने आपल्या करिअरची सुरूवात ही बाॅलिवूड चित्रपटांपासून केली. नेहमीच पूनम पांडे ही तिच्या बोल्डलूकमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर दिसली. पूनम पांडे कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. पूनम पांडे हिचे मुंबईमध्ये आलिशान असे घर देखील आहे. पूनम पांडे हिचे गुरूवारी रात्री निधन झाल्याचे रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे.
पूनम पांडे हिच्या निधनानंतर आता राखी सावंत हिचा एक्स पती आदिल दुर्रानी खान याने मोठे विधान केले. हेच नाही तर आदिल दुर्रानी खान आणि पूनम पांडे हे चांगले मित्र होते. पूनम पांडे हिच्या निधनानंतर आदिल दुर्रानी खान म्हणाला की, पूनम पांडे हिच्या चेहऱ्यावर कधीच दिसले नाही की, ती इतक्या जास्त त्रासामध्ये आहे.
पुढे आदिल दुर्रानी खान म्हणाला, मी आणि पूनम पांडे एका पुरस्कार सोहळ्यात भेटलो, जिथे तिला आणि मला दोघांनाही पुरस्कार मिळाला. दोन दिवसांपूर्वीच पापाराझीसोबत पूनम पांडे दिसली. यावेळी ती आनंदात देखील होती. पूनम पांडे हिला आनंदात बघून कोणीही विचार केला नसेल की, ती कॅन्सरसोबत लढत आहे.
मी पूनम पांडे हिचा मित्र असूनही मला माहिती नव्हते की, ती कॅन्सरचा त्रास सहन करत आहे. मी आतापर्यंत पूनमला चार ते पाच वेळा भेटलो…तिचा स्वभाव जबरदस्त असा होता. ती जाॅली नेचरची होती. राखी सावंत हिचा एक्स पती आदिल आणि पूनम पांडे हे चांगले मित्र होते. पूनम पांडेच्या निधनानंतर आदिलला धक्का बसल्याचे दिसतंय.
पूनम पांडे हिच्या निधनानंतर तिचे कुटुंबिय आणि मित्रांना धक्का बसलाय. आदिल दुर्रानी खान याच्यावर काही दिवसांपूर्वीच राखी सावंत हिने गंभीर आरोप केले. हेच नाही तर थेट कोर्टामध्ये यांचे प्रकरण पोहचले. काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळ आदिल दुर्रानी खान याच्यावर आली. त्यानेही राखीवर गंभीर आरोप केले.