राखी सावंत हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ, थेट बेस्ट फ्रेंड राजश्रीने केली तक्रार दाखल, धक्कादायक खुलासे

राखी सावंत हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. राखी सावंत हिचा पती आदिल दुर्रानी हा काही दिवसांपूर्वीच जेलमधून बाहेर आलाय. त्यानंतर त्याने राखी सावंत हिच्यावर अत्यंत गंभीर आरोप हे केले. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का हा बसला आहे.

राखी सावंत हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ, थेट बेस्ट फ्रेंड राजश्रीने केली तक्रार दाखल, धक्कादायक खुलासे
Follow us
| Updated on: Aug 23, 2023 | 5:04 PM

मुंबई : राखी सावंत हिच्या पर्सनल लाईफमध्ये मोठे वादळ आल्याचे दिसत आहे. आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न केल्यापासून राखी सावंत (Rakhi Sawant) ही सतत चर्चेत आहे. अगोदर राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर गंभीर आरोप करत सर्वांना मोठा धक्का दिला आणि आता जेलबाहेर आल्यापासून आदिल दुर्रानी (Adil Durrani) हा राखी सावंत हिच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहे. राखी आणि आदिल यांच्यामधील आरोप प्रत्यारोपाचे जोरदार सत्र सुरू आहे. अगोदर आदिल दुर्रानी याने प्रेस घेत काही मोठे खुलासे केले आणि आता राखीने.

राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांच्यामधील वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. राखी सावंत हिच्यावर होत असलेले आरोप पाहून चाहत्यांना देखील अत्यंत मोठा धक्का हा बसला आहे. दुसरीकडे राखी हिने देखील आदिल दुर्रानी याच्यावर आरोप हे केले आहेत. राखीने स्पष्ट केले की, आदिल हा माझ्यामुळे सहा महिने जेलमध्ये नव्हता.

राखी सावंत हिच्या आयुष्यामध्ये हे सर्वकाही सुरू असतानाच आता तिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. राखी सावंत हिच्यासोबत नेहमीच दिसणारी तिची बेस्ट फ्रेंड राजश्री हिने आता राखी सावंत हिच्या विरोधात तक्रार केलीये. नेहमीच राखी सावंत हिच्या वाईट काळात तिच्यासोबत राजश्री ही खंबीरपणे उभी असल्याचे दिसत होते.

राखी सावंत हिच्याबद्दल तक्रार केल्यानंतर राजश्री हिने मोठा धमाका करत थेट म्हटले आहे की, मी आता राखी सावंत हिच्याबद्दल मोठे खुलासे करणार आहे आणि तिचा खरा चेहरा हा जगासमोर आणणार आहे. राजश्री हिचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच धक्का बसल्याचे दिसत आहे. आता राजश्री ही राखीबद्दल नेमके काय खुलासे करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

राजश्री हिने राखी सावंत हिची तक्रार केल्यानंतर राखी सावंत हिला याबद्दल विचारण्यात आले. यावर बोलताना राखी सावंत ही म्हणाली की, माझ्या आयुष्यात नेमके काय सुरू झाले आहे हे मलाच आता कळत नाहीये. राजश्री ही माझी बेस्ट फ्रेंड आहे. मात्र, तिने असे का केले हे मला काहीच माहिती नाहीये. ती नेहमीच माझी मैत्रीण राहणार आहे.

राजश्री हिने कायमच माझ्या वाईट काळात माझी साथ दिली आहे आणि तिच्या वाईट काळात मी तिची साथ दिली आहे. मी राजश्रीबद्दल काहीच बोलू शकत नाही. राजश्री हिच्या म्हणण्यानुसार राखी सावंत हिने तिला फोन करून धमकी दिली आहे. आता राजश्री ही राखी सावंत हिच्याबद्दल काय खुलासा करते याकडे सर्वांच्या नजरा या आहेत.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.