Rakhi Sawant | राखी सावंतच्या ड्रायव्हरने दिला मोठा धोका, अभिनेत्रीवर आली चक्क ‘ही’ वेळ, म्हणाली

राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आदिल दुर्रानी याने फक्त बिग बाॅसमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत लग्न केल्याचा धक्कादायक खुलासा राखी सावंत हिने केला. राखी सावंत हिने यापूर्वी आदिल दुर्रानी याच्यावर गंभीर आरोप हे केले आहेत.

Rakhi Sawant | राखी सावंतच्या ड्रायव्हरने दिला मोठा धोका, अभिनेत्रीवर आली चक्क 'ही' वेळ, म्हणाली
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 3:02 PM

मुंबई : ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) ही दुबईवरून आल्यापासून सतत चर्चेत आहे. राखी सावंत ही काही दिवसांपूर्वी दुबईला गेली होती. राखी सावंत हिने दुबईमध्ये डान्स अॅकाडमीला सुरूवात केलीये. काही दिवसांपूर्वीच पापाराझी यांच्यासोबत बोलताना राखी सावंत ही म्हणाली होती की, माझे काम हे सध्या खूप जास्त वाढले आहे. यामुळे मला एका जीवनसाथीची खूप जास्त गरज आहे. मी एकटी काय काय करणार ना शेवटी? राखी सावंत ही काही दिवसांपूर्वी काहीही झाले तरीही आदिल दुर्रानी याला घटस्फोट (Divorce) देणार नसल्याचे सांगताना दिसली होती. मात्र, आता राखी सावंत हिचे सुर बदलले आहेत. राखी सावंत हिने स्पष्ट केले की, आदिल दुर्रानी याला घटस्फोट देणार आहे.

राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न केल्याचे जाहिर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. मात्र, आदिल दुर्रानी याच्यावर काही दिवसांमध्ये अत्यंत गंभीर आरोप करताना राखी सावंत ही दिसली. इतकेच नाही तर यांचा वाद थेट कोर्टात जाऊन पोहचला. आदिल दुर्रानी हा सध्या जेलमध्ये आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हणताना देखील राखी बऱ्याच वेळा दिसली.

नुकताच आता राखी सावंत हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. राखी सावंत हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. या व्हिडीओमध्ये मोठा दावा करताना राखी सावंत ही दिसत आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत ही चक्क रिक्षामध्ये दिसत आहे. यावेळी पापाराझी हे राखीला रिक्षामध्ये फिरण्याचे कारण विचारताना दिसत आहेत.

Rakhi sawant

राखी सावंत म्हणते की, माझ्या आयुष्याला ग्रहण लागले आहे. बघा आता माझ्यावर रिक्षाने फिरण्याची वेळ चक्क आलीये. माझा ड्रायव्हर गाडीची चावी घेऊन पळून गेलाय. इतकेच नाही तर त्याने माझा गोल्डचा मोबाईल आणि काही पैसे देखील चोरी केले आहेत. गरीब आहे म्हणून त्याला मी कामावर ठेवले होते. पण त्याने माझ्यासोबत असे केले.

पप्पू यादव माझ्या आयुष्यात ग्रहण लावून गेल्याचे म्हणताना देखील राखी सावंत ही दिसत आहे. पप्पू यादव हे राखी सावंत हिच्या ड्रायव्हरचे नाव आहे. तो मुळ उत्तर प्रदेशमधील आहे. ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पप्पू यादव याच्याविरोधात तक्रार देणार असल्याचे देखील राखी सावंत हिच्याकडून सांगण्यात आले आहे. आता राखी सावंत हिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.