कोण आहे रकुल प्रित सिंगचा भाऊ? ड्रग्स प्रकरणात तुरुंगात, फ्लॉप करियर पण रॉयल आयुष्य
Rakul Preet Singh Brother Aman Preet Singh: ड्रग्स प्रकरणात तुरुंगात रकुल प्रित सिंगचा भाऊ... करियर फ्लॉप असताना जगतो रॉयल आयुष्य, इन्स्टाग्राममुळे त्याचं रॉयल आयुष्य आलं समोर... अडचणी वाढण्याची शक्यता..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमन याची चर्चा...
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिचा भाऊ अमन प्रीत सिंग सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हैदराबादच्या कोकोन रॅकेटमध्ये अमन याचं नाव समोर आलं आहे. रकुला हिचा भाऊ अमन याला ड्रग्स प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ज्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त अमन याची चर्चा रंगली आहे. रकुला हिचा भाऊ आणि ड्रग्स प्रकरणी तुरुंगात असलेल्या अमन याच्याबद्दल अनेकांना जाणून घ्यायचं आहे. बॉलिवूडमध्ये सक्रिय नसताना अमन कोणत्या मार्गातून कमाई करतो.
अमन याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीचा भाऊ अभिनय विश्वात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. साऊथ इंडस्ट्रीमध्ये अमन याने काम केलं आहे. अमन याने 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘निन्नेपेल्लाडाटा’ या तेलुगू आणि ‘प्रॉडक्शन नंबर 1’ सिनेमात काम केलं आहे.
View this post on Instagram
अनम याने बॉलिवूडच्या ‘रामराज्य’ सिनेमात देखील भूमिका बजावली. पण अमन याचं फिल्मी करियर फार काही चांगलं राहिलं नाही. ज्यामुळे अमन याला बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. त्याने अनेक म्यूझिक व्हिडीओमध्ये देखील काम केलं आहे.
सांगायचं झालं तर, फिल्मी करियर फ्लॉप असला तरी अमन रॉयल आयुष्य जगत आहे. अमन बहिणीसोबत ‘स्टारिंग यू’ नावाच्या टॅलेंट डिस्कव्हरी प्लॅटफॉर्मसाठी काम करतात. रिपोर्टनुसार, ‘स्टारिंग यू’ या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अमन उभरत्या कलाकारांना डिस्ट्रीब्यूटर्स आणि निर्माते मिळवून देतो.
View this post on Instagram
अमन सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अमन सोशल मीडियावर रोजच्या जीवनातील महत्त्वाच्या अपडेट पोस्ट करत असतो. शिवाय अमन याला फिरण्याची देखील फार आवड आहे. तर त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन कळतं की, रकुल हिचा भाऊ अमन बॉलिवूडमध्ये फ्लॉप असला तरी रॉयल आयुष्य जगतो.
अभिनेत्री रकूल प्रीत सिंग…
रकुलने 2009 मध्ये ‘अनिता’ या कन्नड चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली. वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी रकुलने मॉडेलिंगला सुरुवात केली होती. बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्री अनेक भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. रकुल कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2022 पर्यंत रकुलची एकूण संपत्ती ही 6 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 45 कोटी रुपये इतकी आहे.