रकुल प्रीत-जॅकीच्या लग्नात देशमुख कुटुंबीयांनी का वाटली मिठाई? आहे खास कनेक्शन

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही नुकतीच गोव्यात अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानीसोबत लग्नबंधनात अडकली. या लग्नसोहळ्यानंतर रितेश देशमुख यांचा भाऊ धीरज देशमुख यांनी पत्नी दीपशिखासह पापाराझींना मिठाई वाटली. दीपशिखा आणि जॅकी यांचं खास कनेक्शन आहे.

रकुल प्रीत-जॅकीच्या लग्नात देशमुख कुटुंबीयांनी का वाटली मिठाई? आहे खास कनेक्शन
Deepshikha, Dhiraj Vilasrao DeshmukhImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 11:33 AM

मुंबई : 22 फेब्रुवारी 2024 | अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी हे नुकतेच लग्नबंधनात अडकले. गोव्यात या दोघांनी डेस्टिनेशन वेडिंग केलं. या लग्नसोहळ्याला बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते. या लग्नानंतर रकुल आणि जॅकी दोघंही माध्यमांसमोर फोटोसाठी आले. विशेष म्हणजे अभिनेता रितेश देशमुखचा भाऊ धीरज देशमुख आणि त्यांची पत्नी दीपशिखा देशमुख यांनी लग्नानंतर पापाराझींना मिठाई वाटली. रकुल आणि जॅकीच्या लग्नानंतर देशमुख कुटुंबीयांनी मिठाई का वाटली, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या दोघांचं खास कनेक्शन आहे. देशमुखांची सून दीपशिखा ही जॅकी भगनानीची सख्खी बहीण आहे. त्यामुळे भावाच्या लग्नानंतर तिने पतीसोबत मिळून मिठाई वाटली.

भावाच्या लग्नात दीपशिखाने पेस्टल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर धीरज हेसुद्धा पारंपरिक पोशाखात दिसले. या दोघांची मुलगी गुलाबी रंगाच्या लेहंग्यात खूपच सुंदर दिसत होती. लग्नानंतर रकुल आणि जॅकी पापाराझींसमोर फोसोसाठी पोझ द्यायला एकत्र आले. दक्षिण गोव्यातील आयटीसी ग्रँड या आलिशान रिसॉर्टमध्ये हा शाही लग्नसोहळा पार पडला होता. आयटीसी ग्रँड हा 246 रुम्सचा आलिशान हॉटेल रिसॉर्ट आहे. 45 एकर जमिनीवर पसरलेला हा रिसॉर्ट अत्यंत शांत ठिकाणी आहे. जॅकी आणि रकुलने लग्नासाठी या हॉटेलची निवड करताच अनेकांना त्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

रकुल प्रीत आणि जॅकीने ऑक्टोबर 2021 मध्ये प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. तेव्हापासून या दोघांना विविध पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं गेलंय. लॉकडाऊनदरम्यान एकमेकांशी जवळीक वाढल्याचं रकुलने एका मुलाखतीत सांगितलं होतं. हे दोघं एकमेकांचे शेजारी असल्याने लॉकडाऊनच्या काळात त्यांनी डेटिंगला सुरुवात केली. “आमची मैत्री आणि नातं अत्यंत सहजपणे सुरु झालं होतं. आम्ही मित्र म्हणून एकमेकांसोबत वेळ घालवत होते आणि तीन-चार महिन्यांतच आम्हाला एकमेकांच्या प्रेमाची जाणीव झाली होती. आम्ही एकमेकांचे शेजारी आहोत हे आम्हाला सुरुवातीला माहीतसुद्धा नव्हतं. इतक्या वर्षांत आमच्यात कधी मैत्रीसुद्धा झाली नव्हती. पण लॉकडाऊनमध्ये सर्वकाही जुळून आलं”, असं तिने सांगितलं होतं.

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.