आमदार धिरज देशमुख यांच्यासाठी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीची खास पोस्ट, म्हणाली…

Dhiraj Deshmukh | आमदार धिरज देशमुख यांच्यासोबत खास फोटो पोस्ट करत बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा, अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे....

आमदार धिरज देशमुख यांच्यासाठी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीची खास पोस्ट, म्हणाली...
Follow us
| Updated on: Apr 08, 2024 | 10:53 AM

झगमगत्या विश्वातील अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. विशेषतः त्यांच्या सोशल मीडियामुळे.. आता देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाहीतर, अभिनेत्री रकुल प्रित सिंग आहे. रकुल हिने लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांच्यासोबत खास फोटो पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, 6 एप्रिल रोजी धिरज देशमुख यांचा वाढदिवस होता. धिरज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत रकुल हिने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. फोटो पोस्ट करत रकुल हिने धिरज देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रकुल हिने पोस्ट केलेला फोटो तिच्या लग्नातील आहे.

धिरज देशमुख आणि रकुल प्रित सिंग यांच्यात नात काय?

सांगायचं झालं तर, अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी यांच्या लग्नात अनेक सेलिब्रिटी आणि दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. दोघांच्या लग्नात आमदार धिरज देशमुख देखील उपस्थित होते. जॅकी याची बहीण दीपशिखा देशमुख या धिरज देशमुख यांच्या पत्नी आहेत. अशात धिरज देशमुख आणि रकुल प्रित सिंग यांच्यात कौटुंबिक संबंध आहे..

रकुल प्रित हिच्या लग्नात धिरज देशमुख आणि त्यांच्या पत्नीने सर्वांना मिठाई देखील वाटली. लग्नातील व्हिडीओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. रकुल प्रीत आणि जॅकीने ऑक्टोबर 2021 मध्ये प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. तेव्हापासून या दोघांना विविध पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं गेलं.

अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.