झगमगत्या विश्वातील अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. विशेषतः त्यांच्या सोशल मीडियामुळे.. आता देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाहीतर, अभिनेत्री रकुल प्रित सिंग आहे. रकुल हिने लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांच्यासोबत खास फोटो पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, 6 एप्रिल रोजी धिरज देशमुख यांचा वाढदिवस होता. धिरज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत रकुल हिने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. फोटो पोस्ट करत रकुल हिने धिरज देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रकुल हिने पोस्ट केलेला फोटो तिच्या लग्नातील आहे.
सांगायचं झालं तर, अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी यांच्या लग्नात अनेक सेलिब्रिटी आणि दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. दोघांच्या लग्नात आमदार धिरज देशमुख देखील उपस्थित होते. जॅकी याची बहीण दीपशिखा देशमुख या धिरज देशमुख यांच्या पत्नी आहेत. अशात धिरज देशमुख आणि रकुल प्रित सिंग यांच्यात कौटुंबिक संबंध आहे..
रकुल प्रित हिच्या लग्नात धिरज देशमुख आणि त्यांच्या पत्नीने सर्वांना मिठाई देखील वाटली. लग्नातील व्हिडीओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. रकुल प्रीत आणि जॅकीने ऑक्टोबर 2021 मध्ये प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. तेव्हापासून या दोघांना विविध पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं गेलं.
अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.