Ram Charan: मेगास्टार चिरंजीवी होणार आजोबा; रामचरणच्या पत्नीने दिली ‘गुड न्यूज’

RRR स्टार रामचरण लवकरच होणार बाबा; पत्नी उपासनाने दिली गोड बातमी

Ram Charan: मेगास्टार चिरंजीवी होणार आजोबा; रामचरणच्या पत्नीने दिली 'गुड न्यूज'
RRR स्टार रामचरण लवकरच होणार बाबाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 13, 2022 | 7:29 AM

हैदराबाद: मेगास्टार चिरंजीवी यांच्या घरात लवकरच पाळणा हलणार आहे. कारण त्यांची सून आणि साऊथ सुपरस्टार रामचरणची पत्नी उपासना कोनिडेला गरोदर आहे. खुद्द चिरंजीवी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना ही गुड न्यूज दिली. ‘श्री हनुमानजी यांच्या कृपेने उपासना आणि रामचरण यांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे’, अशी पोस्ट त्यांनी लिहिली. रामचरणने ही पोस्ट ट्विटरवर शेअर केली. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

रामचरण आणि उपासना यांच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. याआधी उपासना आई न होण्याच्या निर्णयाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली होती. या निर्णयावरून तिला अनेक प्रश्नांचा सामना करावा लागला आणि अजूनही करावा लागत आहे, असंही तिने म्हटलं होतं. अध्यात्मिक गुरू सदगुरू यांच्याशी बोलताना ती आई न होण्याच्या निर्णयबाबत व्यक्त झाली होती.

हे सुद्धा वाचा

उपासना आणि रामचरण यांचं 2012 मध्ये लग्न झालं. उपासना आणि रामचरणने याआधीही मुलं न होऊ देण्याच्या त्यांच्या निर्णयाबद्दल खुलासा केला होता. गेल्या वर्षी एका पत्रकार परिषदेत राम म्हणाला होता, “मेगास्टार चिरंजीवीचा मुलगा म्हणून चाहत्यांना खूश करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी फॅमिली प्लॅनिंग केल्यास माझ्या ध्येयापासून मी विचलित होऊ शकतो. उपासनाचीही तिच्या आयुष्यात काही ध्येयं आहेत. त्यामुळे आम्ही काही वर्षे मुलं न होऊ देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे.”

लग्नाच्या दहा वर्षांनंतर आता रामचरण आणि उपासना यांच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. याविषयी चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. यावर्षी रामचरणचे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या त्याच्या चित्रपटाने जगभरात 1100 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर आचार्य या चित्रपटात त्याने वडील चिरंजीवीसोबत काम केलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.