Ram Charan | लग्नानंतर 11 वर्षांनी कन्यारत्न, RRR फेम अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

अभिनेता राम चरण आणि त्याची पत्नी उपासना यांना लग्नानंतर 11 वर्षांनी कन्यारत्न प्राप्त झालंय. त्यामुळे अभिनेत्याच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. राम चरणच्या पत्नीला आज रुग्णालयातून डिस्चार्च मिळाला. त्यानंतर दोन्ही पती-पत्नी आपल्या मुलीसह रुग्णालयाबाहेर पाहायला मिळाले.

Ram Charan | लग्नानंतर 11 वर्षांनी कन्यारत्न, RRR फेम अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 10:37 PM

हैदराबाद : आपण पिता होणं हे या जगातील सर्वात जास्त समाधानाच्या गोष्टींपैकी एक असते. पिता होणं ही भावनाच वेगळी असते. तो आनंद फार वेगळा असतो. अर्थात आपल्यावर एक जबाबदारी वाढलेली असते. पण आपल्याला खूप मोठा मानसिक आधार मिळालेला असतो. पिता होण्याचं सुख फार वेगळं आणि मोठं असतं. हेच सुख आज भारताच्या एका दिग्गज अभिनेत्याच्या पदरात पडलं आहे. RRR चित्रपट फेम अभिनेता राम चरण आणि त्याची पत्नी उपासना यांना लग्नाच्या 11 वर्षांनंतर कन्यारत्न प्राप्त झालं आहे. त्यामुळे हे दाम्पत्य अतिशय आनंदात आहे.

पालक होण्याची भावनाच वेगळी असते. त्यामुळे राम चरण आणि त्याच्या पत्नीचा चेहरा आनंदाने खुलला आहे. उपासना हिला आज हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर राम चरण आपल्या पत्नी आणि बाळाला घेऊन घरी गेला. या दरम्यान रुग्णालयाबाहेर राम चरण याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी राम चरण याने सर्वांचे आभार मानले.

राम चरण स्वत: आपल्या लेकीला कवेत घेऊन आनंदात रुग्णालयाबाहेर आला. यावेळी त्याची पत्नी उपासना देखील त्याच्यासोबत होती. दोघंजण खूप खूश होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून रुग्णालयाबाहेर जमलेल्या त्यांच्या चाहत्यांनीदेखील भावना व्यक्त केल्या. अभिनेत्याला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच त्याच्या मुलीला आशीर्वाद दिले. त्यानंतर राम चरणने सर्वांचे आभार मानले.

मुलगी कुणासारखी दिसते? राम चरण म्हणाला…

राम चरणच्या चाहत्यांना मात्र आज त्याच्या मुलीचा चेहरा बघायला मिळाला नाही. या दरम्यान राम चरण आणि उपासना हे पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये बघायला मिळाले. अपोले हॉस्पिटलबाहेर राम चरमच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. सर्वांना आपल्या आवडत्या अभिनेत्याची आणि त्याच्या मुलीची एक झलक पाहायची इच्छा होती.

रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर राम चरण याने प्रसारमाध्यांना प्रतिक्रिया दिली. त्याने चाहत्यांचे प्रेम आणि आशीर्वादासाठी धन्यवाद मानले. यावेळी राम चरण याला त्याची लिटिल मेगा प्रिंसेस नेमकी कुणासारखी दिसतेय? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने मजेशीर पद्धतीने माझ्यासारखी, असं उत्तर दिलं.

मुलीचं नाव काय ठेवलं?

राम चरण याला यावेळी मुलीचं नाव काय ठेवलं? असं विचारण्यात आलं. त्यावर त्याने आपण मुलीच्या नावाबाबत खुलासा करणार नाही असं स्पष्ट केलं. परंपरेनुसार आपण मुलीच्या जन्मानंतर 21 दिवसांनी मुलीच्या नावाचा खुलासा करु, असं त्याने सांगितलं. यावेळी त्याने खूप सुंदर प्रतिक्रिया दिली. “मी आता तीच भावना अनुभवतोय जो जगातील प्रत्येक पिता आपल्या मुलीच्या जन्मानंतर अनुभवतो”, अशी प्रतिक्रिया राम चरण याने दिली.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.