Ganesh Chaturthi | Ram Charan याने लेकीसोबत साजरी केली गणेश चतुर्थी; कुटुंबाचे फोटो तुफान व्हायरल
Ganesh Chaturthi | राम चरण आणि उपासना यांनी लेती सोबत साजरी केली केली गणेश चतुर्थी; अभिनेत्याच्या कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, राम चरण फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा रंगत आहे.
मुंबई : 19 सप्टेंबर 2023 | संपूर्ण देशात आज आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. कारण आज बाप्पाचं आगमन झालं आहे. फक्त सर्व सामान्य नाही तर, सेलिब्रिटी देखील गणरायाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अभिनेता राम चरण याने देखील लेकीसोबत गणेश चतुर्थी साजरी केली. राम चरण याच्या लेकीचा पहिला सण असल्यामुळे कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. खुद्द अभिनेत्याने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सोशल मीडियावर देखील अभिनेत्याने पोस्ट केलेले फोटो व्हायरल होत आहेत.
राम चरण याने गणेश चतुर्थी साजरी करत काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्याने चाहत्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये, ‘आमच्या लाडक्या क्लिन कारासह आम्ही पहिला सण साजरा करत आहोत.’ असं लिहिलं आहे.
अभिनेत्याची पोस्ट चाहत्यांना देखील प्रचंड आवडत आहे. शिवाय अभिनेत्याच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्याने पोस्ट केलेल्या फोटोंपैकी एका फोटोमध्ये आई-वडील चिरंजीवी आणि सुरेखा चिमुकलीला एकटक पाहताना दिसत आहे. गणेश चतुर्थीनिमित्त संपूर्ण राम चरण कुटुंब एकत्र आलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याने पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
राम चरण याच्या लेकीबद्दल सांगायचं झालं तर, उपासना कामिनेनी हिने २० जून रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. राम चरण आणि उपासना यांच्या मुलीचं नाव क्लिन कारा कोनिडेला असं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नाच्या ११ वर्षानंतर राम चरण आणि उपासणा यांनी लेकी स्वागत केल्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.
राम चरण आणि उपासना यांचं लग्न १४ जून २०१२ रोजी झालं होतं. सेलिब्रिटी कपल कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतं. आता देखील लेकीच्या पहिल्या गणेश चतुर्थीमुळे अभिनेत्याचं कुटुंब चर्चेत आहे. राम चरण दाक्षिणात्या सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
सोशल मीडियावर देखील राम चरण याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. राम चरण फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा रंगत आहे.