Ram Charan: मोठ्या मनाचा माणूस; RRR सिनेमाच्या स्टाफला रामचरणने दिली सोन्याची नाणी

एस. एस. राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित RRR हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई करतोय. अवघ्या नऊ दिवसांत या चित्रपटाने जगभरात तब्बल 850 कोटींचा गल्ला जमवला आहे. रामचरण, ज्युनियर एनटीआर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात आलिया भट्ट आणि अजय देवगण हे बॉलिवूड स्टारसुद्धा झळकले.

Ram Charan: मोठ्या मनाचा माणूस; RRR सिनेमाच्या स्टाफला रामचरणने दिली सोन्याची नाणी
Ram CharanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 4:51 PM

एस. एस. राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित RRR हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई करतोय. अवघ्या नऊ दिवसांत या चित्रपटाने जगभरात तब्बल 850 कोटींचा गल्ला जमवला आहे. रामचरण, ज्युनियर एनटीआर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात आलिया भट्ट आणि अजय देवगण हे बॉलिवूड स्टारसुद्धा झळकले. जगभरात या चित्रपटाला मिळत असलेल्या यशाला पाहून रामचरणने (Ram Charan) त्याच्या टीमला चक्क सोन्याच्या नाणी भेट म्हणून दिल्या आहेत. RRR च्या युनिट क्रू मेंबर्सना आणि टीममधील इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांना त्याने 10 ग्राम सोन्याचं नाणं भेट म्हणून दिल्याचं वृत्त आहे. 2018 पासून तो या चित्रपटासाठी मेहनत घेत होता. या चार वर्षांच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं असून या फळाचा गोडवा त्याने टीममधील मेंबर्ससोबत मिळून चाखला आहे. (Gold Coins)

19 नोव्हेंबर 2018 पासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. हैदराबादमधील विविध ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग पार पडलं. चित्रपटाने कमाईचा 800 कोटींचा टप्पा पार केल्यानंतर रामचरणने त्याच्या क्रू मेंबर्सना घरी चहापानासाठी बोलावलं आणि त्यावेळी त्याने सोन्याचं नाणं त्यांना भेट म्हणून दिलं. कॅमेरा असिस्टंट्स, प्रॉडक्शन मॅनेजर्स, अकाऊंट्स, फोटोग्राफर्स आणि इतर सहाय्यकांचा यात समावेश होता. या सोन्याच्या नाण्यावर एका बाजूला RRR हे नाव आणि दुसऱ्या बाजूला रामचरण हे नाव कोरण्यात आलं आहे.

RRR ची झलक-

View this post on Instagram

A post shared by Jr NTR (@jrntr)

RRR या चित्रपटात देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ दाखवण्यात आला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती चित्रपटाची कथा फिरते. इतिहासातील ही दोन महत्त्वाची नावं जरी घेतली असली तरी चित्रपटाची संपूर्ण कथा ही काल्पनिक आहे. यामध्ये आलियाने सीता ही व्यक्तीरेखा साकारली आहे.

हेही वाचा:

Ananya Panday: तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अनन्या पांडे-इशान खट्टरचं ब्रेकअप

VIDEO: आईची साडी नेसून मायराचा अफलातून डान्स; ‘गंगुबाई’ आलियासुद्धा पडेल फिकी!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.