RRR: ‘नाटू नाटू’ गाण्यावर रामचरणच्या सासूबाईंचा डान्स पाहिलात का? व्हिडीओ व्हायरल
आरआरआर या चित्रपटातील हे गाणं आणि या गाण्यातील हुकस्टेप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांच्यावर हे गाणं चित्रित झालं होतं.
स्वित्झर्लंड: एस. एस. राजामौली यांच्या ‘RRR’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार या गाण्याने जिंकला. आरआरआर या चित्रपटातील हे गाणं आणि या गाण्यातील हुकस्टेप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांच्यावर हे गाणं चित्रित झालं होतं. आता चक्क रामचरणच्या सासूने जावयाच्या ‘नाटू नाटू’ गाण्यावर ठेका धरला आहे. हा व्हिडीओ रामचरणची पत्नी उपासनाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
उपासनाची आई शोभना कमिनेनी या स्वित्झर्लंडमधील दावोसच्या रस्त्यावर नाटू नाटूची हुकस्टेप करताना या व्हिडीओत पहायला मिळतंय. शोभना या अपोलो हॉस्पिटलच्या कार्यकारी उपाध्यक्षा आहेत. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या वार्षिक मिटींगमध्ये त्यांनी हजेरी लावली होती.
आईचा हा व्हिडीओ शेअर करत उपसनाने लिहिलं, ‘अत्यंत अभिमानी सासू’. या व्हिडीओवर रामचरणच्या चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
पहा व्हिडीओ-
Very proud mother in law – #NatuNatu in Davos ❤️? Love mom @shobanakamineni https://t.co/yBc6CI4f79
— Upasana Konidela (@upasanakonidela) January 18, 2023
गोल्डन ग्लोब हा हॉलिवूडमधील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणारा RRR हा भारतातील पहिला चित्रपट ठरला आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकण्यासाठी जगभरातील चित्रपटांमध्ये चुरस रंगलेली असते. RRR या चित्रपटाला दोन विभागांमध्ये नॉमिनेशन मिळालं होतं. नॉन इंग्लिश लँग्वेज आणि बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर या दोन विभागांमध्ये RRR ला नामांकन मिळालं होतं. त्यापैकी बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चरमध्ये ‘नाटू नाटू’ने बाजी मारली.
‘नाटू नाटू’ हे 2022 मधील सर्वांत हिट गाण्यांपैकी एक आहे. एम. एम. किरवाणी यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं. तर कालभैरव आणि राहुल सिप्लीगुंज यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.