Kiara-Sidharth | रामचरणची पत्नी उपासनाने का मागितली सिद्धार्थ-कियाराची माफी? कमेंटची होतेय चर्चा

या फोटोंवर चाहत्यांसह इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. मात्र या सर्व कमेंट्समध्ये RRR फेम अभिनेता रामचरणच्या पत्नीच्या कमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. कारण रामचरणची पत्नी उपासना हिने सिद्धार्थ-कियाराची माफी मागितली आहे.

Kiara-Sidharth | रामचरणची पत्नी उपासनाने का मागितली सिद्धार्थ-कियाराची माफी? कमेंटची होतेय चर्चा
Kiara-Sidharth | रामचरणची पत्नी उपासनाने का मागितली सिद्धार्थ-कियाराची माफी? Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 3:03 PM

मुंबई: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी नुकतेच लग्नबंधनात अडकले. राजस्थानमधील जैसलमेर इथल्या सूर्यगढ पॅलेसमध्ये 7 फेब्रुवारी रोजी हा लग्नसोहळा पार पडला. मंगळवारी रात्री कियारा आणि सिद्धार्थने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो पोस्ट केले. या फोटोंवर चाहत्यांसह इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. मात्र या सर्व कमेंट्समध्ये RRR फेम अभिनेता रामचरणच्या पत्नीच्या कमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. कारण रामचरणची पत्नी उपासना हिने सिद्धार्थ-कियाराची माफी मागितली आहे.

सिद्धार्थ आणि कियाराला करण जोहरपासून कतरिना कैफ, विकी कौशल, आलिया भट्ट, वरुण धवनसह बऱ्याच सेलिब्रिटींनी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र त्यादरम्यान रामचरणची पत्नी उपासना कोनिडेला हिने नवविवाहित दाम्पत्याची माफी मागितली आहे. यामागचं कारण म्हणजे सिद्धार्थ आणि कियाराने उपासना आणि रामचरण यांना लग्नासाठी आमंत्रित केलं होतं. मात्र काही कारणास्तव दोघं या लग्नात उपस्थित राहू शकले नव्हते. म्हणूनच उपासनाने दोघांची माफी मागितली.

हे सुद्धा वाचा

‘आता आमची पर्मनंट बुकिंग झाली आहे. आमच्या पुढील प्रवासासाठी आम्हाला सर्वांचा आशीर्वाद आणि प्रेम हवंय’, असं कॅप्शन देत कियारा आणि सिद्धार्थने लग्नाचे फोटो पोस्ट केले होते. त्यावर कमेंट करत उपासनाने लिहिलं, ‘खूप खूप शुभेच्छा. हे खूपच सुंदर आहे. माफ करा पण आम्ही लग्नसोहळ्यात सहभागी होऊ शकलो नाही. तुम्हा दोघांना खूप सारं प्रेम.’

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

सिद्धार्थ-कियाराची लव्हस्टोरी

सिद्धार्थ-कियाराची पहिली भेट ही ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटानिमित्त आयोजित केलेल्या एका पार्टीत झाली. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ‘शेरशाह’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांनाही खूप आवडली.

2010 मध्ये करण जोहरने त्याच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून सिद्धार्थला लाँच केलं. तर कियारा अडवाणीने 2014 मध्ये ‘फगली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हे दोघं त्यांच्या रिलेशनशिपविषयी कधीच माध्यमांसमोर व्यक्त झाले नाहीत. मात्र बॉलिवूडच्या विविध पार्ट्यांमध्ये किंवा सहलींवर जाताना दोघांना नेहमीच एकत्र पाहिलं गेलं.

कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमध्ये कियारा पहिल्यांदाच तिच्या नात्याविषयी व्यक्त झाली होती. “आम्ही लस्ट स्टोरीजच्या रॅप-अप पार्टीमध्ये सहज बोलू लागलो होतो. तेव्हाच आम्ही पहिली भेट झाली होती. ती भेट अगदी सहज होती. मात्र तो दिवस मी कधीच विसरणार नाही”, असं ती म्हणाली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.