Ram Mandir : अमिताभ बच्चन यांच्या घरातील राम मंदिराचे फोटो होताय व्हायरल
Amitabh bachchan : बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांच्या घरात देखील राम मंदिर आहे. जलसा या त्यांच्या घरातील राम मंदिराचे फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत. अमिताभ बच्चन यांनी हे फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे नुकताना दुसऱ्यांदा अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी पोहोचले होते. २२ जानेवारी रोजी देखील ते उपस्थित होते. आता अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील त्यांच्या जलसा या घरातील काही फोटो शेअर केले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ या घरामध्ये रामाचे सुंदर मंदिर आहे. या राम मंदिरात ते पूजा करताना दिसत आहेत.
T 4918 – आस्था 🚩🚩 दुग्ध अर्पण शिव जी पे, और जल अर्पण तुलसी पे pic.twitter.com/W6Y0vW1E4k
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 12, 2024
अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलेल्या फोटोंमध्ये ते शिवलिंगावर दूध अर्पण करताना दिसत होते. यावेळी त्यांनी तुळशीच्या रोपालाही पाणी देखील अर्पण केले. रविवारी आपल्या चाहत्यांसाठी त्यांनी हे खास फोटो शेअर केले आहेत.
T 4913 – in the continued presence of the wellwishers .. and my immense gratitude to them .. 🙏 .. every Sunday from 1982 to today 2024 .. that’s like 42 years ! many among them may not have been born when it started .. BUT .. here they are .. pic.twitter.com/7CbdwHDrfd
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 6, 2024
दर रविवारी अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी हजारो लोकं त्यांच्या घराबागहेर जमतात. 41 वर्षांहून अधिक काळ अमिताभ त्यांना असेच लोकांना भेटत आहेत.
राम मंदिरात जावून पुन्हा घेतले दर्शन
राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी अमिताभ बच्चन यांना देखील आमंत्रण देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा अमिताभ बच्चन हे अयोध्येला गेले होते. यावेळी त्यांनी त्या दरम्यानचा एक फोटो देखील शेअर केला होता.
T 4916 – जय श्री राम 🚩 आस्था ने फिर बुलाया, और खींचे चले गये हम pic.twitter.com/FoqCdG5zIb
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 10, 2024
अमिताभ बच्चन हे दीपिका पदुकोण आणि प्रभास यांच्यासोबत ‘कल्की 2898 एडी’ या साय-फाय ॲक्शन थ्रिलरमध्ये दिसणार आहेत. नाग अश्विनच्या चित्रपटात कमल हासन आणि दिशा पटानी यांच्याही भूमिका आहेत. तो 9 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.