परदेशातही राममय वातावरण, ‘जय श्री राम’ गाण्यावर किली पॉल याचा डान्स

ram mandir pran pratishtha : राममय वातावरणार रमला किली पॉल, 'जय श्री राम' गाण्याला परदेशात बोलबाला... व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल... अयोध्या याठिकाणी प्रभू राम यांची प्राम प्रतिष्ठा होत असल्यामुळे भारतात आनंदाचं वातावरण

परदेशातही राममय वातावरण, 'जय श्री राम' गाण्यावर किली पॉल याचा डान्स
Follow us
| Updated on: Jan 22, 2024 | 10:53 AM

ram mandir pran pratishtha : संपूर्ण भारतात राममय वातावरण आहे. भरतातच नाही तर परदेशात देखील आनंदाचं वातावरण आहे. टांझानियाचा प्रसिद्ध सोशल मीडिया सेन्सेशन किली पॉल (Kili Paul) हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. किली पॉल बॉलिवूड गाण्यांवर ठेका धरत त्याच्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. चाहते देखील किली पॉल याच्या प्रत्येक व्हिडीओला भरभरून प्रेम देतात. आता देखील किली पॉल याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये किली पॉल ‘जय श्री राम’ गाण्यावर जान्स करताना दिसत आहे.

किलीने खाश दिवशी व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे त्याला भारतीय संस्कृतीची भुरळ पडल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे. किली पॉल याच्या व्हिडीओला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. त्याच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. भारतात किली पॉल याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Kili Paul (@kili_paul)

सांगायचं झालं तर किली पॉल कायम भारतीय गाण्यांवर लिपसिंक करत व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्याच्या व्हिडीओला प्रेक्षकांकडून प्रेम देखील मिळतं. किली पॉलचा प्रत्येक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात अनेक सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत.

किली पॉलच्या सोशल मीडिया पोस्टवर चाहते कमेंट करत प्रेम व्यक्त करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘राम फक्त एक नाव नाही तर, भावना आहे…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘धन्यवाद किली आमच्या संस्कृतीवर व्हिडीओ तयार केल्यामुळे…’ किलीच्या व्हिडीओवर असंख्य चाहते कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत…

एवढंच नाही तर, किली याने अयोध्या येथील राम मंदिरात येण्याची देखील इच्छा व्यक्त केली आहे. किली पॉल सोशल मीडियावर असंख्य चाहते आहेत. जगभरातील अनेक लोक किली याला सोशल मीडियावर फॉलो करत असतात. किली सतत चाहत्यांचं मनोरंजन करत असल्यामुळे चाहते देखील त्याच्या नव्या व्हिडीओच्या प्रतीक्षेत असतात.

किली सर्वात जास्त व्हिडीओ बॉलिवूड गाण्यांवर तयार करत असतो. पण किलीने इतर भाषांमधील गाण्यांवर ठेरलेला ठेका देखील चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. किलीचे सोशल मीडियावर जवळपास 6.5 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.