Ram Setu: ‘राम सेतू’ची दुसऱ्या दिवशीही ‘थँक गॉड’वर मात; कमावले इतके कोटी रुपये
अक्षयचा 'राम सेतू' अजयच्या 'थँक गॉड'वर पडतोय भारी; जाणून घ्या कमाई
मुंबई- अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस आणि नुशरत भरूचा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘राम सेतू’ (Ram Setu) या चित्रपटाच्या कमाईत दुसऱ्या दिवशी घट पहायला मिळाली. पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षा दुसऱ्या दिवशी 25 टक्क्यांची घट झाली. तरीसुद्धा अक्षयच्या (Akshay Kumar) या चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत अजय देवगणच्या ‘थँक गॉड’ या चित्रपटाला मागे टाकलं आहे. ‘राम सेतू’ने दुसऱ्या दिवशी जवळपास 11 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांची कमाई 26 कोटींच्या घरात झाली आहे.
‘राम सेतू’ या चित्रपटासोबत अजय देवगणचा ‘थँक गॉड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र थँक गॉडने दुसऱ्या दिवशी फक्त 6 कोटी रुपये कमावले. ‘राम सेतू’साठी पहिला वीकेंड अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि ‘रक्षाबंधन’ या तीन चित्रपटांनंतर अक्षयला मोठा दिलासा मिळणार आहे. कारण या चित्रपटांच्या तुलनेत राम सेतूची कमाई ही समाधानकारक आहे.
अक्षयचे या वर्षी प्रदर्शित झालेले चित्रपट आणि त्यांच्या पहिल्या दिवसाची कमाई-
बच्चन पांडे- 13 कोटी रुपये सम्राट पृथ्वीराज- 10.60 कोटी रुपये रक्षाबंधन- 8.20 कोटी रुपये राम सेतू- 15.25 कोटी रुपये
#RamSetu declines on Day 2, but stays in double digits… Holds well at mass circuits, but major centres remain low… Biz on Thu and Fri [working days] crucial, before the weekend begins… Tue 15.25 cr, Wed 11.40 cr. Total: ₹ 26.65 cr. #India biz. pic.twitter.com/IjD53gN9iY
— taran adarsh (@taran_adarsh) October 27, 2022
यावर्षी प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपटांपैकी मोजकेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. ज्यामध्ये विवेक अग्निहोत्रींचा ‘द काश्मीर फाईल्स’, कार्तिक आर्यनचा ‘भुल भुलैय्या 2’, संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगुबाई काठियावाडी’ आणि अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटांचा समावेश आहे. राम सेतूने चांगली कमाई केली तर बॉलिवूडचा आणखी एक दिलासा मिळू शकेल.
दुसरीकडे दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला अजूनही सुरूच आहे. केजीएफ 2, RRR नंतर कांतारा, कार्तिकेय 2, पोन्नियिन सेल्वन 1 यांसारख्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला.