Ram Setu: अखेर अक्षयचं नशीब फळफळलं; पहिल्या दिवशी ‘राम सेतू’ची दमदार कमाई
'राम सेतू'ने पहिल्याच दिवशी 'भुल भुलैय्या 2'ला टाकलं मागे; जाणून घ्या कमाई..
मुंबई- अक्षय कुमारची (Akshay Kumar) मुख्य भूमिका असलेल्या ‘राम सेतू’ (Ram Setu) या चित्रपटाच्या कमाईची सुरुवात खूप चांगली झाली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर 25 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी ‘राम सेतू’ने जवळपास 15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या वर्षभरातील अक्षयचा हा पाचवा चित्रपट आहे. मात्र पहिल्या तीन चित्रपटांपेक्षी ‘राम सेतू’ची ओपनिंग कमाई चांगली झाली आहे. याआधी बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज आणि रक्षाबंधन या अक्षयच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नव्हता. तर ‘कटपुतली’ हा त्याचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता.
राम सेतूला पहिल्या दिवशी सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. दुसरीकडे याच दिवशी अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्राचा ‘थँक गॉड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र राम सेतूपेक्षा या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई कमी झाली.
#RamSetu starts well on Day 1 [#Diwali], especially in mass pockets… Average at bigger centres/metros… The biggg holiday has given it a head start and it’s crucial to maintain the momentum in the long, *extended* weekend… Tue ₹ 15.25 cr. #India biz. pic.twitter.com/R9Is6ZHIA4
— taran adarsh (@taran_adarsh) October 26, 2022
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या वृत्तानुसार, राम सेतूने पहिल्या दिवशी 15.25 कोटी रुपयांची कमाई केली. राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार यांसारख्या राज्यांमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. ‘ब्रह्मास्त्र- पार्ट वन शिवा’नंतर चांगली कमाई करणारा हा चित्रपट ठरू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 8 कोटी रुपये कमावले होते. त्या तुलनेत राम सेतूने दुप्पट कमाई केली आहे. दिवाळी सुट्ट्यांचा फायदाही या चित्रपटाला होणार आहे.
राम सेतूमध्ये अक्षयने डॉ. आर्यन कुलश्रेष्ठ नावाच्या एका पुरातत्व विशेषज्ञाची भूमिका साकारली आहे. यामध्ये अक्षयसोबत जॅकलिन फर्नांडिस, नुशरत भरूचा, प्रवेश राणा आणि नस्सीर यांच्याही भूमिका आहेत. अभिषेक शर्माने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.