Mandakini Son: मंदाकिनीच्या मुलासमोर बॉलिवूडचे हँडसम अभिनेते फेल, फोटो पाहून म्हणाल…

| Updated on: Jul 01, 2024 | 2:54 PM

Mandakini Son: ‘राम तेरी गंगा मैली' फेम अभिनेत्री मंदाकिनी हिच्या मुलाची सर्वत्र चर्चा, अभिनेत्रीच्या मुलाचा फोटो पाहून म्हणाल..., मंदाकिना आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर असते कायम सक्रिय... फोटो तुफान व्हायरल

Mandakini Son:  मंदाकिनीच्या मुलासमोर बॉलिवूडचे हँडसम अभिनेते फेल, फोटो पाहून म्हणाल...
Follow us on

बॉलिवूडच्या अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या आज झगमगत्या विश्वापासून दूर आनंदी खासगी आयुष्य जगत आहेत. अभिनेत्री सध्याच्या घडीला अभिनयापासून दूर असल्या तरी खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री मंदाकिनी… अभिनेत्री मंदाकिनी हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सांगायचं झालं तर, राज कपूर यांच्यामुळे मंदाकिनी हिला नवीन ओळख मिळाली. 1985 साली प्रदर्शित झालेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ सिनेमात मंदाकिनी आणि राजीव कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

‘राम तेरी गंगा मैली’ सिनेमामुळे एका रात्रीत मंदाकिनी हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये वाढ झाली. आज मंदाकिनी अभिनयापासून दूर आहेत. पण त्यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. सध्या मंदाकिनी यांच्या मुलाची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

मंदाकिनी यांच्या मुलाचं नाव रब्बिल ठाकुर असं आहे. रब्बिल हुबेहूब त्याच्या आई सारखा दिसतो. रब्बिल हँडसम आणि गुड लुकिंग आहे. मंदाकिनीने सांगितले होते की, अभिनेत्रीने मुलासाठी साजन अग्रवालच्या म्युझिक व्हिडिओमध्ये काम करण्यास होकार दिला. आईच्या भावनांवर आधारित या गाण्यात मंदाकिनी तिच्या मुलासोबत दिसली होती. गाण्याचं शीर्षक ‘मा ओ मां’ आहे.

अभिनेत्रीचा मुलगा रब्बिल याचा एका फोटो आईसोबत आहे, जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, रब्बिल इतर स्टार किड्स प्रमाणे प्रसिद्ध आणि लोकप्रिय नाही. पण त्याच्यासमोर बॉलिवूड अभिनेते देखील फेल आहेत.

 

 

मंदाकिनी हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘राम तेरी गंगा मैली’ सिनेमानंतर अभिनेत्रीने ‘डान्स डान्स’, ‘लडाई’, ‘कहां है कानून’, ‘नाग नागिन’, ‘प्यार के नाम कुर्बान’, ‘प्यार करके देखो’ यांसारख्या यशस्वी सिनेमात काम केलं. मंदाकिनी यांचा शेवटचा सिनेमा 1996 मध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमाचं नाव ‘जोरदार’ होतं. सिनेमात गोविंदा आदित्य पांचोली आणि नीलम कोठारी यांनी देखील मुख्य भूमिका साकारली होती.