Sakshi Chopra | ‘हिने तर उर्फीलाही मागे टाकलं’; रामानंद सागर यांच्या पणतीचा सुपरबोल्ड अंदाज
या मुलाखतीत तिने बॉलिवूड पदार्पणाविषयीही मौन सोडलं होतं. "मला अनेक बॉलिवूड चित्रपटांचे ऑफर्स मिळाले होते. पण मी त्याबद्दल फारसं बोलू शकत नाही. मला गायिका व्हायचं आहे. मी तर बॉलिवूड चित्रपटसुद्धा बघत नाही," असं ती म्हणाली.
मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद आणि तिचं अजबगजब फॅशन नेटकऱ्यांसाठी काही नवीन नाही. सोशल मीडियावर दररोज तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामुळे चित्रविचित्र किंवा अत्यंत बोल्ड कपडे म्हटलं की नेटकऱ्यांना उर्फीचीच आठवण येते. मात्र दूरदर्शनवरील लोकप्रिय ‘रामायण’ या मालिकेचे निर्माते रामानंद सागर यांच्या पणतीने बोल्डनेसच्या बाबतीत उर्फीलाही मागे टाकलं आहे. साक्षी चोप्रा असं तिचं नाव असून सोशल मीडियावर सध्या तिचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. साक्षीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी तिची तुलना उर्फीशी केली आहे तर काहींना ती उर्फीपेक्षाही अधिक बोल्ड वाटत आहे.
शुक्रवारी मुंबईतील एका कॅफेबाहेर साक्षीला पाहिलं गेलं. यावेळी पापाराझींनी तिचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला. साक्षीने बिकिनी टॉप आणि जाळीदार स्कर्ट परिधान केला होता. तिचा हा लूक इतका बोल्ड होता की त्यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘हिने तर उर्फीलाही मागे टाकलंय’, असं एकाने लिहिलं. तर ‘उर्फी जावेद पार्ट 2’ असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘उर्फीची बहीण कुल्फी’ अशीही खिल्ली नेटकऱ्यांनी उडवली आहे.
साक्षी चोप्रा ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर ती सतत बोल्ड फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसते. सोशल मीडिया सेलिब्रिटीशिवाय ती गायिकासुद्धा आहे. तिचा स्वत:चा युट्यूब चॅनल आहे. एका मुलाखतीत साक्षी तिच्या पणजोबांविषयी व्यक्त झाली होती. “माझ्या पणजोबांच्या नावामुळे माझ्यावर खूप दबाव येतो. मी सोशल मीडियावर बोल्ड फोटो पोस्ट करताच नेटकरी ट्रोल करू लागतात. ते माझे पणजोबा रामानंद सागर यांच्याशी माझी तुलना करतात”, असं ती म्हणाली होती.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
या मुलाखतीत तिने बॉलिवूड पदार्पणाविषयीही मौन सोडलं होतं. “मला अनेक बॉलिवूड चित्रपटांचे ऑफर्स मिळाले होते. पण मी त्याबद्दल फारसं बोलू शकत नाही. मला गायिका व्हायचं आहे. मी तर बॉलिवूड चित्रपटसुद्धा बघत नाही. पण मला डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वत:ची वेगळी ओळख बनवायची आहे”, असं तिने सांगितलं.